Wednesday, March 29, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत वि. ऑस्ट्रेलिया : पहिल्या कसोटीत भारताचा शानदार विजय, पाहुण्या संघाची धुळधाण उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी

भारत वि. ऑस्ट्रेलिया : पहिल्या कसोटीत भारताचा शानदार विजय, पाहुण्या संघाची धुळधाण उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी

February 11, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Team-India

Photo Courtesy: bcci.tv


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे पार पडला. पाच दिवसांचा कसोटी सामना भारताने तिसऱ्याच दिवशी खिशात घातला. या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय साकारला. या विजयात भारतीय गोलंदाजांनी सिंहाचा वाटा उचलला. विशेष म्हणजे, भारतीय संघाने हा सामना जिंकत कसोटी मालिकेत 1-0ने आघाडी घेतली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला येत ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात सर्वबाद 177 धावाच करता आल्या होत्या. यानंतर भारताने फलंदाजीला येत धावफलकावर 400 धावा लावल्या. त्यानंतर फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाचा डाव अवघ्या 91 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे हा सामना भारतीय संघाने 132 धावांनी खिशात घातला.

A splendid five-wicket haul in the second innings from @ashwinravi99 inspires #TeamIndia to a comprehensive victory in the first #INDvAUS Test 🙌🏻

Scorecard ▶️ https://t.co/SwTGoyHfZx…#INDvAUS | @mastercardindia pic.twitter.com/wvecdm80k1

— BCCI (@BCCI) February 11, 2023

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाकडून फलंदाजी करताना मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 123 चेंडूंचा सामना करताना 49 धावा कुटल्या. यामध्ये फक्त 8 चौकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त स्टीव्ह स्मिथ (37), ऍलेक्स कॅरे (36) आणि पीटर हँड्सकाँब (31) यांनाच दोन आकडी धावसंख्या पार करता आली. इतर एकही फलंदाज 10 धावांचा आकडाही पार करू शकला नाही.

1ST Test. India Won by an innings and 132 Run(s) https://t.co/SwTGoyHfZx #INDvAUS @mastercardindia

— BCCI (@BCCI) February 11, 2023

यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 22 षटकात 47 धावा खर्च करत 5 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त आर अश्विन (R Ashwin) याने 3, तर मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी 1 विकेट नावावर केली.

भारताची 223 धावांची आघाडी
यानंतर फलंदाजी उतरलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 212 चेंडूंचा सामना करताना 2 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने 120 धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त अक्षर पटेल (84), रवींद्र जडेजा (70), मोहम्मद शमी (37), आर अश्विन (23), केएल राहुल (20) आणि विराट कोहली (12) यांनीही मोलाचे योगदान दिले. याव्यतिरिक्त चार फलंदाज दोन आकडी धावसंख्या पार करू शकले नाहीत. मात्र, भारताने धावफलकावर 400 धावांचा आकडा लावला होता. तसेच, 223 धावांची आघाडीही घेतली होती.

ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना टॉड मर्फी याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 47 षटके गोलंदाजी करताना 124 धावा खर्च करत 7 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार पॅट कमिन्स याने 2 आणि नेथन लायन याने 1 विकेट नावावर केली.

ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव
भारताच्या 223 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाच्या एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांच्याकडून स्टीव्ह स्मिथ याने नाबाद 25 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त मार्नस लॅब्युशेन याने 17 धावा केल्या. तसेच, डेविड वॉर्नर आणि ऍलेक्स कॅरे यांनी प्रत्येकी 10 धावांचे योगदान दिले. मात्र, इतर एकही फलंदाज 10 धावांचा आकडा पार करू शकला नाही. तसेच, नियमित अंतराने विकेट्स गमावत 32.3 षटकात अवघ्या 91 धावांवर ऑस्ट्रेलिया संघाचा डाव संपुष्टात आला.

यावेळी भारताकडून गोलंदाजी करताना पहिल्या डावात 3 विकेट्स घेणाऱ्या अश्विनने 5 विकेट्स घेत कसोटी कारकीर्दीतील 31वे विकेट्सचे पंचक पूर्ण केले. अश्विनने 12 षटके गोलंदाजी करताना 37 धावा देत 5 विकेट्स खिशात घातल्या. त्याच्याव्यतिरिक्त मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा याने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. तसेच, अक्षर पटेल याने 1 विकेट नावावर केली. (India won by an innings and 132 runs against australia in first test)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीयांना सतावणाऱ्या मर्फीचा शमीने उठवला बाजार, गुडघ्यावर बसून भिरकावला गगनचुंबी षटकार; व्हिडिओ पाहाच

नागपूरमध्ये भारताचे पारडे जड! कसोटीच्या पहिल्या डावात घेतली तब्बल ‘इतक्या’ धावांची आघाडी


Next Post
Ravichandran Ashwin

अनिल कुंबळेंच्या मोठ्या विक्रमाला धक्का! मायदेशात कसोटी खेळताना अश्विनने रचला इतिहास

Ravindra Jadeja

ब्रेकिंग! सामनावीर ठरेलेल्या रविंद्र जडेजावरच आयसीसीची मोठी कारवाई, बसला आर्थिक नुकसानीचा फटका

Photo Courtesy: Twitter/Virat Kohli

घरच्या मैदानावर सव्वाशेरच! दहा वर्षापासून मायदेशात टीम इंडियाच बादशाह

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143