---Advertisement---

दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाखाली भारताचा सोपा विजय, डर्बीशायरला ७ विकेट्सने केले पराभूत

On: शनिवार, जुलै 2, 2022 8:30 AM
Dinesh-Karthik
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर असून त्यांना १ कसोटी सामना, ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळायची आहे. एकीकडे शुक्रवारपासून (०१ जुलै) ऍजबस्टन येथे पाचव्या पुनर्निधारित कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे याच दिवशी भारतीय संघ विरुद्ध डर्बीशायर यांच्यात टी२०चा सराव सामना खेळला गेला. दिनेश कार्तिकच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला. 

या सामन्यात (Derbyshire vs India) प्रथम फलंदाजी करताना डर्बीशायरचा संघ ८ विकेट्स गमावत १५० धावाच करू शकला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १६.४ षटकातच हे लक्ष्य पूर्ण केले आणि सामना (Warm Up T20 Match) खिशात घातला.

डर्बीशायरच्या १५१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून दीपक हुड्डाने सर्वाधिक धावा केल्या. जबरदस्त फॉर्मात असलेल्या हुड्डाने ३७ चेंडूत ५९ धावांची धमाकेदार खेळी खेळली. या खेळीदरम्यान त्याने २ षटकार आणि ५ चौकारही मारले. सलामीवीर संजू सॅमसननेही ३० चेंडूत ३८ धावा जोडल्या. तर सूर्यकुमार यादवने २२ चेंडूत ३६ धावांची खेळी खेळली. या डावादरम्यान डर्बीशायरकडून बेन ऍचिसनने २ विकेट्स घेतल्या. तसेच मॅटी मॅककिर्ननने एका फलंदाजाला बाद केले.

तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना डर्बीशायरकडून वेन मॅडसनने सर्वाधिक २८ धावा केल्या. कार्टराइट (२७ धावा), ब्रूक गिस्ट (२३ धावा), ऍलेक्स ह्यूजेस (२४ धावा) आणि मॅटी मॅककिर्नन (१६ धावा) यांनी थोडेफार योगदान दिले. इतर फलंदाज एकेरी धावेवरच बाद झाले. या डावात भारताकडून अर्शदीप सिंग आणि उमरान मलिक या युवा गोलंदाजांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. तसेच अक्षर पटेल आणि वेंकटेश अय्यर यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केले.

भारतीय संघ रविवारी (०३ जुलै) नॉर्थम्पटनशायरविरुद्ध दुसरा सराव सामना खेळेल. त्यानंतर ७ जुलैपासून भारत विरुद्ध इंग्लंड संघातील ३ सामन्यांची टी२० मालिका सुरू होईल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

जेव्हा वेस्ट इंडिजच्या बलाढ्य संघाला जगातील सर्वात कमजोर संघाने दाखवला होता चांगलाच इंगा

पंतच्या शतकाने सावरला डाव, जडेजाही सेंच्यूरीच्या नजीक; भारताच्या पहिल्या दिवसाखेर ७ बाद ३३८ धावा

पंतने एका दगडात मारले तीन पक्षी! शतक झळकावत ठरलाय धोनीपेक्षाही महान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---