Loading...

हैद्राबाद टी२०सामन्यातून या खेळाडूंनी केले टीम इंडियात पुनरागमन, अशी आहे ११ जणांची टीम

हैद्राबाद। आजपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात 3 सामन्यांची टी20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...

या सामन्यातून भूवनेश्वर कुमार भारताच्या टी20 संघात पुनरागमन करत आहेत. दुखापतीनंतर तो भारतीय संघाकडून खेळण्यास सज्ज झाला आहे. तर केएल राहुल शिखर धवन ऐवजी सलामीला फलंदाजी करेल. धवन दुखापतीमुळे या मालिकेला मुकला आहे.

तसेच भारताने अंतिम 11 जणांच्या संघात यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतलाच पसंती दिली आहे. त्याचबरोबर शिवम दुबेने भारताच्या 11 जणांच्या संघातील स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. बर्थडे बॉय रविंद्र जडेजाही भारताच्या टी20 संघात पुनरागमन करत आहे.

वेस्ट इंडीजने या सामन्यासाठी 11 जणांच्या संघात लेंडन सिमन्स, जेसन होल्डर, शिमरॉन हेटमायर, एव्हिन लूईस या नियमित खेळाडूंना संधी दिली आहे.

Loading...

आत्तापर्यंत भारत विरुद्ध वेस्ट इंडीज संघात 14 टी20 सामने झाले आहेत. यातील 8 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. तर 5 सामने वेस्ट इंडीजने जिंकले आहेत. तसेच 1 सामन्याचा निकाल लागलेला नाही.

असे आहेत 11 जणांचे संघ –

भारत – रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, युजवेंद्र चहल

Loading...

वेस्ट इंडीज – लेंडल सिमन्स, एव्हिन लुईस, ब्रॅंडन किंग, शिमरॉन हेटमायर, किरोन पोलार्ड (कर्णधार), दिनेश रामदिन (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, खॅरी पियर, शेल्डन कोट्रेल, केसरीक विल्यम्स, हेडन वॉल्श

You might also like
Loading...