भारतीय क्रीडा क्षेत्रातून बुधवारी (२८ जुलै) सकाळी एक दु:खद बातमी समोर आली आहे. भारताचे दिग्गज बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन झाले आहे. त्यांनी पुण्यात वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भारताला बॅडमिंटनमध्ये पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवून देणारे आणि पहिले अर्जून पुरस्कार विजेते म्हणून त्यांची ओळख आहे.
१२ मे १९३३ साली सांगली येथे जन्मलेल्या नंदू नाटेकर यांनी त्यांच्या १५ वर्षांच्या कालावधीत आंतरराष्ट्रीय स्तरावर काही अविस्मरणीय विजय मिळवत बॅडमिंटनमध्ये भारताचे नाव प्रसिद्धीस आणले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर १०० पेक्षाही अधिक विजेतीपदं आपल्या नावावर केली होती. त्यांनी केवळ एकेरीतच नाही, तर दुहेरी, मिश्र दुहेरीतही विजेतीपदं पटकावली.
नंदू नाटेकर यांनी १९५४ साली ऑल इंग्लंड चॅम्पियनशीप स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यांनी या स्पर्धेत १९८० आणि १९८१ साली त्यांनी दुहेरीत विजेतेपद जिंकले. नाटेकर यांनी १९५३ साली वयाच्या २० व्या वर्षी पहिल्यांदा भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्यांनी सहावेळा राष्ट्रीय विजेतेपदही जिंकली आहेत.
On behalf of the Badminton Association of India, we condole the sad demise of legendary player- Shri Nandu Natekar.
A man of many firsts, the Father of Indian Badminton, your journey will continue to inspire generations to come.
Wishing prayers and strength to the family.#RIP pic.twitter.com/qp1uqDf8Jp— BAI Media (@BAI_Media) July 28, 2021
नाटेकर यांनी भारतीय संघाकडून प्रतिनिधित्व करताना थॉमस कप स्पर्धेत शानदार कामगिरी केली होती. त्यांनी या स्पर्धेत १९५१ ते १९६३ सालादरम्यान एकेरीत १६ पैकी १२ सामने जिंकले, तसेच दुहेरीत १६ पैकी ८ सामने जिंकले. त्यांनी या स्पर्धेत १९५९,१९६१ आणि १९६३ साली भारताचे नेतृत्व देखील केले. त्यांनी १९६५ साली जमैका येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत देखील भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
त्यांनी १९५६ साली क्वालालंपूर येथे सालांगोर आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे एकेरीत विजेतेपद मिळवले होते. त्यावेळी ते बॅडमिंटनमध्ये भारताकडून पहिले आंतरराष्ट्रीय विजेतेपद मिळवणारे खेळाडू ठरले होते. ते बॅडमिंटन व्यतिरिक्त टेनिस देखील उत्तम खेळायचे. त्यांनी १९५१-५२ साली ज्यूनियर टेनिस चॅम्पियनशीपमध्ये उपविजेतेपद मिळवले होते. त्यावेळी ते रामनाथन कृष्णन यांच्याविरुद्ध पराभूत झाले होते.
नाटेकर यांना १९६१ साली अर्जून पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
महत्त्वाच्या बातम्या –
हॉकीमध्ये भारतीय महिला संघाला अपयश; सलग तिसऱ्या सामन्यात करावा लागला पराभवाचा सामना
टोकियो ऑलिंपिक: पीव्ही सिंधूचा हाँगकाँगच्या प्रतिस्पर्धीवर सहज विजयासह उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश
वाढदिवस विशेष: ५० वर्षांपूर्वी गॅरी सोबर्समुळे एका तरुणाला मुंबईत मिळाली होती नोकरी…