fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कसोटी, वनडे आणि टी२०त सर्वाधिक महागडे षटक टाकणारे ३ भारतीय गोलंदाज

Indian Bowlers Most Runs Coneceted in an Over Test ODI T20I Record

क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येक खेळाडू आपल्यासाठी अनुकूल परिस्थितीची अपेक्षा करत असतो. क्रिकेट नेहमीच फलंदाजांचा खेळ मानला जात आहे. तसेच चाहतेही खेळाडूंच्या विस्फोटक खेळींची वाट पाहत असतात. भारतीय गोलंदाजांनी अनेक ठिकाणी जाऊन उत्कृष्ट गोलंदाजी केली आहे. तसेच सध्या जगातील सर्वाधित चांगले गोलंदाज भारतीय संघाकडे आहेत.

तरी जगभरात असे विस्फोटक फलंदाज आहेत, जे प्रत्येक क्रिकेट प्रकारात विस्फोटक शैलीत फलंदाजी करतात. तसेच विरोधी संघावर दबाब टाकण्यासाठी एखाद्या गोलंदाजाच्या षटकात मोठ-मोठे शॉट्स खेळतात. क्रिकेट एक असा खेळ आहे, जिथे जर दिवस चांगला नसेल तर दिग्गज गोलंदाजही महागडे षटक टाकतात.

ही बाब ध्यानात घेत आपण या लेखात क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील अशा भारतीय गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांंनी आपल्या गोलंदाजीदरम्यान एका षटकात सर्वाधिक धाव दिल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारातील एका षटकात सर्वाधिक धावा देणारे ३ भारतीय गोलंदाज- Indian Bowlers Most Runs Coneceted in an Over Test ODI T20I Record

१. कसोटी क्रिकेट- हरभजन सिंग (२७ धावा)

भारतीय संघाकडून १९९८ ते २०१६ पर्यंत १०३ कसोटी सामने खेळणाऱ्या हरभजन सिंगने (Harbhajan Singh) आतापर्यंत कसोटीत ४१७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटी भारताकडून क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देण्याचा विक्रमही आहे.

भारत आणि पाकिस्तान संघात लाहोर येथे २००६साली कसोटी सामना खेळण्यात आला होता. त्यात हरभजनला शाहिद आफ्रिदीने एका षटकात ४ षटकारांच्या मदतीने २७ धावा जडल्या होत्या. तसेच ८० चेंडूत १०३ धावांची विस्फोटक खेळी केली होती. हरभजनने दिलेल्या या धावा कोणत्याही भारतीय गोलंदाजाने कसोटीत दिलेल्या सर्वाधिक धावा आहेत. त्या कसोटी सामन्यात हरभजनने ३४ षटके गोलंदाजी करताना १७६ धावा दिल्या होत्या. तसेच त्याला त्या सामन्यात एकही विकेट घेता आली नव्हती.

२. वनडे क्रिकेट- युवराज सिंग (३० धावा)

भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंगने (Yuvraj Singh) इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ६ षटकार ठोकत विक्रम केला होता. परंतु त्याच्या नावावर वनडेत भारतीय संघाच्या कोणत्याही गोलंदाजाद्वारे सर्वाधिक धावा देण्याचाही विक्रम आहे.

सप्टेंबर २००७मध्ये ओव्हल मैदानावर इंग्लंडविरुद्ध खेळताना दिमित्री मस्कारेन्हासने डावाच्या ५०व्या षटकात युवराजला ५ षटकार मारून षटकात तब्बल ३० धावा कुटल्या होत्या. भारतातर्फे वनडे क्रिकेटमध्ये एकाच षटाकामध्ये सर्वाधिक धावा देण्याचा लाजीरवाणा विक्रम युवराजच्याच नावावर आहे.

३. टी२० क्रिकेट- शिवम दुबे (३४ धावा)

भारत आणि न्यूझीलंड संघात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील ५ वा सामना २ फेब्रुवारी, २०२०रोजी खेळण्यात आला होता. त्या सामन्यात शिवम दुबेच्या (Shivam Dube) पहिल्या आणि संंघाच्या १०व्या षटकादरम्यान टीम सायफर्ट आणि रॉस टेलरने मिळून एका षटकात ३४ धावा ठोकल्या होत्या. याबरोबरच ४ वर्षांपूर्वी स्टुअर्ट बिन्नीने एका षटकात दिलेल्या ३० धावांचा विक्रम मोडला होता. तसेच तो भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला होता. तरीही हा सामना भारतीय संघाने जिंकला आणि न्यूझीलंडला त्यांच्याच देशात ५ सामन्यांच्या टी२० मालिकेत ५-०ने व्हाईटवॉश दिला होता.

वाचनीय लेख-

-विश्वचषकात खेळलेल्या ११ महान खेळाडूंचा संघ, दोन नावे आहेत भारतीय

-टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा रतीब घालणारे जगातील ५ फलंदाज, पहा किती आहे भारतीय नावं

-जगातील ५ असे महान क्रिकेटर, जे कधीही विश्वचषकात खेळले नाहीत

You might also like