---Advertisement---

टीम इंडियाच्या या चार गोलंदाजांनी हॅट्रिक घेत गाजवले २०१९ चे वर्ष!

On: गुरूवार, डिसेंबर 19, 2019 1:14 PM
---Advertisement---

विशाखापट्टणम। काल(18 डिसेंबर) भारत विरुद्ध वेस्ट इंडिज(India vs West Indies) संघात दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारताने 107 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या विजयात चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने(Kuldeep Yadav) हॅट्रिक(hat-trick) घेत महत्त्वाचा वाटा उचलला.

त्याने गोलंदाजी करताना 33 व्या षटकातील चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर अनुक्रमे शाय होप, जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफला बाद करत वनेडतील त्याची दुसरी हॅट्रिक साजरी केली. त्याने या सामन्यात 10 षटके गोलंदाजी करताना 52 धावा देत 3 विकेट्स घेतल्या.

तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन हॅट्रिक घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. कुलदीपने याआधी 2017मध्ये कोलकाताला ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या वनडे सामन्यात हॅट्रिक घेतली होती.

तसेच 2019मध्ये भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारा तो एकूण चौथा गोलंदाज ठरला आहे.

यावर्षात कुलदीपच्या आधी भारताकडून जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) कसोटीत आणि मोहम्मद शमीने(Mohammed Shami) वनडेमध्ये आणि दीपक चाहरने(Deepak Chahar) टी20मध्ये हॅट्रिक घेतली आहे. विशेष म्हणजे एका वर्षात क्रिकेटच्या तीन्ही प्रकारात हॅट्रिक घेणारा भारत पहिलाच संघ आहे.

बुमराहने ऑगस्टमध्ये किंग्स्टन येथे वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी मालिकेतील दुसरा सामना खेळताना हॅट्रिक घेतली होती. तसेच त्याआधी शमीने यावर्षी जूनमध्ये 2019 वनडे विश्वचषकात अफगाणिस्तान विरुद्ध साऊथँम्पटन येथे खेळताना हॅट्रिक घेतली होती.

त्याचबरोबर चाहरने 10 नोव्हेंबरला बांगलादेश विरुद्ध नागपूरला पार पडलेल्या टी20 सामन्यात हॅट्रिक घेतली होती.

2019 या वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅट्रिक घेणारे भारतीय गोलंदाज –

कसोटी –

जसप्रीत बुमराह (विरुद्ध वेस्ट इंडिज, किंग्स्टन)

वनडे –

मोहम्मद शमी (विरुद्ध अफगाणिस्तान, साऊथँप्टन)

कुलदीप यादव (विरुद्ध वेस्ट इंडिज, विशाखापट्टणम)

टी20 –

दिपक चाहर (विरुद्ध बांगलादेश, नागपूर)

https://twitter.com/Maha_Sports/status/1207285123881693184

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---