बीसीसीआयने बुधवारी (८ डिसेंबर) भारताच्या आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली. यावेळी रोहित शर्माला विराट कोहलीच्या जागी भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवले गेले आहे. रोहितला एकदिवसीय संघाचा कर्णधार केल्यानंतर चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचसोबत चाहत्यांनी रोहितचे एक जुने ट्वीट देखील व्हायरल केले आहे, जे त्याने १० वर्षांपूर्वी केले होते.
रोहित शर्मा (rohit sharma) याला २०११ साली खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यानंतर रोहितने हे ट्वीट (rohit sharma 10 years old tweet) केले होते. रोहितला यावेळी भारतीय संघात संधी न मिळाल्यामुळे त्याने ट्वीटच्या माध्यमातून निराशा व्यक्ते केली होती.
त्याने ट्वीटमध्ये लिहिले होते की, ‘विश्वचषक संघात न निवडलो गेल्यामुळे मी खूप- खूप निराश आहे. पण मला पुढे जायची गरज आहे. मात्र, इमानदारीने सांगायचे तर, हा माझ्यासाठी एक मोठा झटका होता.’ चाहत्यांनी आता रोहितचे हे जुने ट्वीट त्याला एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवल्यानंतर व्हायरल केले आहे.
13 years later, Rohit Sharma is going to lead the Indian team in ODI World Cup. pic.twitter.com/gKmKBW6Eit
— Johns. (@CricCrazyJohns) December 8, 2021
रोहितला त्यावेळी विश्वचषक खेळण्याची संधी का मिळाली नव्हती?, हे त्याचे लहानपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी सांगितले होते. लाड यांनी सांगितले होते की, “२००७-२००९ पर्यंत रोहितने चांगली खेळी केली आणि जिम्बाब्वेविरुद्ध दोन शतके केली होती. त्यानंतर २००९ आणि २०११ च्या दरम्यान प्रसिद्धी आणि पैशाच्या कारणास्तव तो डायवर्ट झाला होता. तो क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत नव्हता. यानंतर त्याला २०११ विश्वचषकातून बाहेर केले गेले होतो, कारण त्यादरम्यान तो चांगले प्रदर्शन करत नव्हता.”
“ही गोष्ट रोहितसाठी खूप हैराण करणारी होती. मी रोहितला माझ्या घरी बोलवले आणि म्हणालो, ऐक रोहित, तुला माहिती आहे की, तू याठिकाणी फक्त क्रिकेटमुळे का आहे? तुला क्रिकेटमधून प्रसिद्धी, पैसा सर्वकाही मिळाले. पण आता तू तुझ्या क्रिकेटपर लक्ष देत नाहीय. आता सराव करायला सुरुवात कर, विराट कोहली तुझ्या मागून आला आणि तो २०११ विश्वचषक संघात आहे, हा फरक पाहा, तुला तुझ्या क्रिकेटवर लक्ष द्यायचे आहे,” असेही त्यांनी सांगितले होते.
महत्वाच्या बातम्या –
‘आऊट ऑफ फॉर्म’ रहाणेसाठी देवाप्रमाणे धावून आला ‘हा’ दिग्गज! नाहीतर कसोटी कारकिर्द आली असती संपुष्टात
“मुंबई इंडियन्स नाही डेक्कन चार्जर्समध्ये रोहितच्या नेतृत्वास पैलू पडले”
रोहितला वनडे संघाचा कर्णधार बनवल्याने खुश झाला पाकिस्तानी क्रिकेटपटू; म्हणाला…