क्रिकेटटॉप बातम्या

टीम इंडियाची ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांशी भेट, रोहित शर्माचे ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भाषण!

भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियात आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळण्यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. टीम इंडियाने या दौऱ्याची सुरुवात शानदार शैलीत केली. कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत, भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. अशा प्रकारे भारताने ऑस्ट्रेलियामध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठा विजय मिळवण्याचा विक्रम केला. आता 6 डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली.

पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय गुलाबी चेंडू (डे-नाईट टेस्ट) सराव सामन्यापूर्वी 28 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी भारतीय क्रिकेट संघाचे स्वागत केले. पंतप्रधानांशी झालेल्या भेटीदरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्माने आपल्या सर्व सहकाऱ्यांची ओळख करून दिली. यावेळी अल्बानीजने पर्थ कसोटीत संघाच्या विजयाचे नायक ठरलेल्या जसप्रीत बुमराह आणि विराट कोहली यांचे कौतुक केले.

यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मानेही ऑस्ट्रेलियाच्या संसदेला संबोधित केले. आपल्या भाषणात त्याने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांच्या समृद्ध इतिहासावर प्रकाश टाकला. ज्यात त्यांच्या क्रिकेटवरील सामायिक प्रेमाचा समावेश आहे. तो असेही म्हणाला की भारतीय खेळाडूंना ऑस्ट्रेलियात खेळण्याचे आव्हान आवडते. तसेच खेळाडूंना तेथील संस्कृती जाणून घेण्यात आनंद होतो.

हेही वाचा-

IND VS AUS; दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात स्टार खेळाडूची एंन्ट्री! मधली फळी आणखी बळकट
चॅम्पियन्स ट्रॉफी प्रकरणी आयसीसीकडे 3 पर्याय, पाकिस्तान बीसीसीआयपुढे झुकणार का?
“पलटन माझ्या हृदयात नेहमीच… “, मुंबई इंडियन्सपासून विभक्त झाल्यानंतर इशान किशन भावूक

Related Articles