येत्या काही महिन्यांमध्ये आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ च्या अंतिम सामन्याचे गणित निश्चित होईल. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्या हंगामातील उपविजेता भारतीय संघ यंदाही अंतिम सामना गाठू शकेल का, यावर सर्वांची नजर आहे. मात्र अंतिम सामन्याचे चित्र स्पष्ट होण्यापूर्वीच आगामी हंगामातील भारतीय संघाचे वेळापत्रक पुढे आले असल्याचे समजत आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२७ च्या हंगामात भारतीय संघ कोणत्या संघांशी दोन हात करणार आहे?, याबद्दलची माहिती पुढे आली आहे.
आयसीसी (ICC) या महिन्यात आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत २०२३-२०२७ (World Test Championship 2023-27) या भविष्यातील कालावधीतील क्रिकेट स्पर्धा आणि सामन्यांसाठी भविष्य दौरा कार्यक्रमावर मोहोर लावेल. या भविष्य दौरा कार्यक्रमात कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २ हंगामांचाही (२०२३-२५ आणि २०२५-२७) समावेश असेल. आयसीसीची ही बैठक २५ ते २६ जुलैदरम्यान इंग्लंडच्या बर्मिंघममध्ये होणार आहे.
तत्पूर्वी क्रिकेट वेबसाइट ‘ईएसपीएन क्रिकइंफो’ने सांगितले आहे की, पहिल्या आणि आता सुरू असलेल्या दुसऱ्या हंगामांप्रमाणेच पुढील २ हंगांमातही प्रत्येक संघ ६-६ मालिका खेळणार आहे. भारतीय संघाबद्दल बोलायचे झाल्यास, या दोन्ही हंगामात त्यांना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध प्रत्येकी १ कसोटी मालिका मायदेशात खेळायची आहे आणि एक त्यांच्या यजमानपदाखाली खेळायची आहे. यातील खास बाब म्हणजे, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. १९९२ नंतर पहिल्यांदाच उभय संघात ५ सामन्यांची मालिका होईल.
याखेरीज दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडसारख्या संघांशीही भारतीय संघ भिडेल. २०१३-२५ च्या हंगामात भारतीय संघ इंग्लंड, न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळेल. तर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळण्यासाठी त्यांच्या देशाचा दौरा करेल. २०१५-२७ च्या हंगामात, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघ कसोटी मालिकांसाठी भारतात येतील. तर उर्वरित ३ मालिकांसाठी भारतीय संघ इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा दौरा करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलच्या विरोधावर पीसीबीचे अध्यक्ष रमीज राझांना नाही मिळणार आयसीसी साथ..!
नव्या नावासह धुमधडाक्यात ‘या’ टी२० लीगचा होणार पुनश्च हरिओम! हे खेळाडू होऊ शकतात सहभागी
टी२० विश्वचषकानंतर ‘हे’ ३ भारतीय क्रिकेटर घेऊ शकतात निवृत्ती, एकटा राहिलाय सर्वात मोठा मॅच विनर