भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू तसेच चेन्नई सुपर किंग्स संघाचा विस्फोटक फलंदाज अंबाती रायुडू याने इंडियन प्रीमिअर लीग 2023 च्या अंतिम सामन्यापूर्वी आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर चेन्नईने विजेतेपद पटकावत त्याला विजयी निरोप दिला. यानंतर अवघ्या काही तासानंतरच त्याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. सोशल मीडियावर एक पत्र पोस्ट करत याबाबतची घोषणा केली.
https://www.instagram.com/p/Cs3b88rxXvj/?igshid=MzRlODBiNWFlZA==
रायुडू हा मागील जवळपास 20 वर्षांपासून भारतीय क्रिकेटच्या जवळपास राहिला. आपल्या निवृत्तीची घोषणा करताना त्याने या काळात आपल्याला साथ दिलेल्या सर्वांचे आभार मानले. भारताच्या पंधरा वर्षाखालील संघातून खेळण्यापासून सर्वोच्च स्तरावर खेळण्यापर्यंत आपण आनंद घेतला असे त्याने म्हटले. त्याने बीसीसीआय, आंध्रप्रदेश क्रिकेट संघटना मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्सचे आभार व्यक्त केले. रायुडूने 2019 वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड न झाल्यानंतर तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर त्याने आपली निवृत्ती मागे घेतली.
मात्र, त्यानंतर त्याला भारतीय संघासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र, त्याने आयपीएलमध्ये खेळणे चालू ठेवले. त्यानंतर त्याने आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.
त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीत 55 वनडे सामने खेळताना 1694 धावा केल्या. तर, 6 टी20 मध्ये त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याच्या आयपीएल कारकीर्दीचा विचार केल्यास 204 सामन्यात 4332 धावा केल्या. रोहित शर्मानंतर सहा आयपीएल विजेतेपदे पटकावणारा तो केवळ दुसरा क्रिकेटपटू ठरला.
(Indian Cricketer Ambati Rayudu Announced Retirement From All Forms Of Cricket After IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लाज वाटते तू भारतरत्न असल्याची’, कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रकरणी निखिल वागळेंची सचिनवर जहरी टीका
सीएसकेच्या यशामागील खरा चाणक्य! 16 वर्षांपासून सुपर किंग्सला वाट दाखवणारा ‘सुपर कोच’ फ्लेमिंग