सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदा उमरान मलिक याने त्याच्या तेज तर्रार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध झालेल्या आयपीएल २०२२मधील ४०व्या सामन्यात त्याने आपल्या सनसनाटी चेंडूने वृद्धिमान साहाच्या बत्त्या गुल केल्या होत्या. हा चेंडू त्याने १५२.८च्या वेगाने टाकला होता. हा हैदराबाद विरुद्ध गुजरात सामन्यातील सर्वात वेगवान चेंडू होता. तर आयपीएलच्या टालू हंगामातील चौथा सर्वात वेगवान चेंडू होता.
उमरानच्या (Umran Malik) या वेगवान गोलंदाजीनंतर आता प्रश्न उपस्थित होत आहे की, तो भारताचा सर्वात वेगवान गोलंदाजी करणारा पहिलाच गोलंदाज आहे का? या लेखात आपण त्याच गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी आयपीएलपासून ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटपर्यंत १५० किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी (India’s Fast Bowlers) केली आहे.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात डोकावून पाहिले तर, उमरानपूर्वी बरेच भारतीय वेगवान गोलंदाज होऊ गेले आहेत, ज्यांनी १५० किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली आहे. परंतु आयपीएलमध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम मात्र उमरानच्याच नावावर आहे. त्याने गतवर्षी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध १५३ किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी केली होती. परंतु यावर्षी त्याने आपल्या गोलंदाजीत सुधारणा करत १५३.३० किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी केली आहे, जो कोणत्या भारतीयाने टाकलेला सर्वात वेगवान चेंडू आहे.
श्रीनाथने टाकलाय सर्वात वेगवान चेंडू
आंतरराष्ट्रीय क्रिकेटबाबत बोलायचे झाल्यास, भारताकडून माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ यांनी सर्वात वेगवान चेंडू टाकला आहे. त्यांनी त्याच्या कारकिर्दीदरम्यान १५४.५ किमी दर ताशी वेगाने गोलंदाजी केली होती. हा विक्रम आजही त्यांच्या नावावर कायम आहे.
श्रीनाथ यांच्याव्यतिरिक्त काही भारतीय गोलंदाजांनी आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५० किंवा त्यापेक्षा जास्त वेगाने गोलंदाजी केली आहे. यामध्ये इरफान पठाण (१५३.७ किमी दर ताशी, उमरान मलिक (१५३.३० किमी दर ताशी), जसप्रीत बुमराह (१५३ किमी दर ताशी), इशांत शर्मा (१५२.६ किमी दर ताशी), वरुण ऍरॉन (१५२.५ किमी दर ताशी) आणि उमेश यादव (१५२.२ किमी दर ताशी) यांचा समावेश आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ज्या केकेआरविरुद्ध पहिल्यांदाच कॅप्टन्सी केली, आज त्याच टीमकडून श्रेयस अय्यरचे खास ‘अर्धशतक’
कर्णधारावरच भडकला गुजरातचा मॅचविनर राहुल तेवतिया; प्रश्न उपस्थित करत म्हणाला, ‘आधी तूच आम्हाला…’
माजी भारतीय क्रिकेटरने निवडली ‘सार्वकालिन आयपीएल इलेव्हन’, धोनीकडे नेतृत्त्वाची धुरा; पाहा संघ