भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. याच पार्श्वभूमीवर देशात अनेक ठिकाणी टाळेबंदी देखील करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सचिन तेंडुलकर आणि इरफान पठाण अशा बऱ्याच क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच आता एक दुःखद बातमी समोर येत आहे. २०१२ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या खेळाडूच्या आईचे कोरोनामुळे निधन झाले आहे.
या घटनेमुळे संपूर्ण क्रिकेटजगतात शोककळा पसरली आहे. भारतीय संघाने २०१२ मध्ये झालेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. या स्पर्धेत हरमित सिंगने उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्याची आई परमजीत कौर यांनी जगाचा निरोप घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हरमितने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एका विशेष इंजेक्शनची मागणी केली होती.
हरमित सिंगने आपल्या कारकीर्दीत एकूण ३१ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ८७ गडी बाद केले आहेत. तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने २१ तर देशांतर्गत टी-२० क्रिकेटमध्ये त्याला ३ गडी बाद करण्यात यश आले आहे. २००९ मध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबई संघासाठी पदार्पण केले होते. त्यांनतर त्याने त्रिपुराकडे आपला मोर्चा वळवला. त्याने फेब्रुवारी २०२० मध्ये आसाम संघाविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता.
त्याने इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. २०१३ साली राजस्थान रॉयल्स संघात पदार्पण केले होते. पुणे वॉरियर्स इंडियासोबत झालेल्या सामन्यात त्याने रॉस टेलरला माघारी धाडले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
RCBvSRH: चुरसीच्या लढतीत विराटसेना ठरली यशस्वी, कर्णधाराने ‘या’ २ खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय
शानदार विजयानंतर कॅप्टन कोहलीच्या आनंदावर विरजण, ‘त्या’ असभ्य कृतीमुळे सामना रेफरींनी फटकारले
हैदराबादचा पराभव झाला असला तरी अर्धशतकी खेळी करणाऱ्या वॉर्नरचा मोठा विक्रम; रोहित, धवनला टाकले मागे