भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. आपल्या ट्विटर हँडलवरून एक पत्र लिहित त्याने हा निर्णय सार्वजनिक केला. सलामी ते फिनिशर अशा सर्व क्रमांकावर खेळलेला उथप्पा 2007 मध्ये टी20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य होता.
It has been my greatest honour to represent my country and my state, Karnataka. However, all good things must come to an end, and with a grateful heart, I have decided to retire from all forms of Indian cricket.
Thank you all ❤️ pic.twitter.com/GvWrIx2NRs
— Robin Aiyuda Uthappa (@robbieuthappa) September 14, 2022
भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा एकेकाळी नियमित सदस्य असलेल्या उथप्पाने ट्विटरवर एक पत्र लिहीत आपली निवृत्ती जाहीर केली. त्याने लिहिले,
‘माझ्या 20 वर्षाच्या व्यावसायिक कारकिर्दीत मला नेहमी पाठिंबा देणाऱ्या भारतीय क्रिकेट संघ व कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे मी आभार मानतो. हा एक अविस्मरणीय प्रवास होता. या प्रवासाचा मी आनंद लुटला. आयुष्यातील एक नवा टप्पा आता मी सुरू करेल.’
कर्नाटकसाठी प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत असताना उथप्पाने 2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. अनेकदा तो यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडत. त्याने भारतीय संघासाठी 46 वनडे व 13 टी20 सामने खेळले. यामध्ये त्याने अनुक्रमे 934 व 249 धावा केल्या. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये कर्नाटक व केरळसाठी खेळताना 9946 धावा केल्या. यासोबतच तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स व चेन्नई सुपर किंग्स या संघांचा भाग राहिला. त्याची आयपीएल कारकीर्द शानदार राहिली. त्याने आयपीएलमध्ये 205 सामन्यात 197 डाव खेळताना 27.51 च्या सरासरीने 4952 धावा केल्या. यामध्ये 27 अर्धशतकांचा समावेश होता. 2012 व 2014 मध्ये आयपीएल जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचा तो सदस्य होता. तर, 2021 मध्येही चेन्नई सुपर किंग्ससह तो आयपीएल विजेता बनला होता. 2014 आयपीएलमध्ये त्याने सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप जिंकली होती.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियात रोहित-राहुल अन् पंतची बॅट होते म्यान! आशा फक्त विराटवर; पाहा आकडेवारी
टी-20 विश्वचषकात होणार हर्षल पटेलची धुलाई? पत्रकाराच्या प्रश्नावर गावसकरांचे रोखठोक उत्तर, म्हणाले…