भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन सध्या भारतीय संघातून बाहेर आहे. तसेच, सातत्याने त्याला दुर्लक्षित केले जात आहे. मात्र, अनेकदा संधी मिळाल्यानंतर त्याने संधीचं सोनं करून दाखवलं आहे. तो दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला होता. अशात त्याने पुनरागमनासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएमध्ये मेहनत घेतली. सध्या तो पूर्णपणे फिट झाला आहे. याची पुष्टीदेखील त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे. अशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेपूर्वी त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
संजू सॅमसनकडे मोठी जबाबदारी
संजू सॅमसन (Sanju Samson) याला एका संघाकडून मोठी जबाबदारी मिळाली आहे. इंडियन सुपर लीग (Indian Super League) स्पर्धेतील केरला ब्लास्टर्स एफसी (Kerala Blasters FC) संघाने संजूवर मोठी जबाबदारी सोपवली आहे. संजू सॅमसन केरला ब्लास्टर्स एफसी संघाचा ब्रँड एम्बॅसेडर (Sanju Samson Kerala Blasters FC Brand Ambassador) बनला आहे. क्रिकेटनंतर आता संजू मैदानावर या क्लब आणि त्याच्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.
संघाचा असा विश्वास आहे की, संजू केरळच्या युवा खेळाडूंसाठी एक प्रेरणा आहे. तसेच, एक ब्रँड एम्बॅसेडरच्या रूपात तो सामील झाल्यामुळे त्याचा प्रभाव वाढेल.
ബ്ലാസ്റ്റേഴ്സ് കുടുംബത്തിലേക്ക് സ്വാഗതം സഞ്ജു ????
Yellow Army, let’s give @IamSanjuSamson a ???????????????????? ???????????????????????????? as he joins us as our ???????????????????? ????????????????????????????????????????! ????????#ഒന്നായിപോരാടാം #KBFC #KeralaBlasters pic.twitter.com/cpO1yw2dD8
— Kerala Blasters FC (@KeralaBlasters) February 6, 2023
केरला ब्लास्टर्स एफसीचा भाग बनल्यानंतर काय म्हणाला संजू?
भारतीय क्रिकेटपटू संजू सॅमसन केरला ब्लास्टर्स एफसी (KBFC) फुटबॉल संघाचा ब्रँड एम्बॅसेडर बनला आहे. यानंतर संजूने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याला क्रिकेटव्यतिरिक्त फुटबॉल पाहण्यासही खूप आवडत होते. कारण, त्याचे वडील पेशाने फुटबॉलपटू होते. त्याने ब्रँड एम्बॅसेडर बनल्यानंतर प्रतिक्रिया देत म्हटले की, “मी नेहमीपासूनच फुटबॉल चाहता राहिलो आहे. माझे वडील एक व्यावसायिक फुटबॉलपटू होते. फुटबॉल नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळचा खेळ राहिला आहे. केरला ब्लास्टर्स एफसी या संघाचा ब्रँड एम्बॅसेडर बनून मला सन्मानाची जाणीव होत आहे.”
This one's for you, Yellow Army! ????
Let's hear from @IamSanjuSamson himself as he shares his excitement on joining the Blasters family! ????????
Get your tickets for the Southern Rivalry ➡️ https://t.co/TILMZnc0vd#ഒന്നായിപോരാടാം #KBFC #KeralaBlasters pic.twitter.com/n7sZ8k2iRO
— Kerala Blasters FC (@KeralaBlasters) February 6, 2023
पुढे बोलताना तो म्हणाला की, “या राज्याच्या फुटबॉलचा गौरव पुन्हा आणण्यासाठी क्लबने स्थापनेनंतर बरंच काही केलं आहे. मी खेळाचा विकास करण्यासाठी सोपवलेल्या भूमिकेसाठी तयार आहे.”
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार
विशेष म्हणजे, संजू सॅमसन हा इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या संघाचा कर्णधार आहे. राजस्थान या संघाने आयपीएल इतिहासातील पहिला-वहिला 2008 सालचा किताब पटकावला होता. आता आयपीएल 2023मध्ये संजूच्या नेतृत्वात राजस्थान संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (indian cricketer sanju samson will be the brand ambassador of kerala blasters in isl)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
खराब गोलंदाजीमुळे बुमराहवर भडकलेला विराट, पण ‘या’ भारतीयाने मध्यस्थी करत म्हटले होते, ‘त्याला सोड…’
‘मुलांना बीपासून सुरू होणाऱ्या कोणत्या गोष्टीची जास्त गरज?’, पोरीचा प्रश्न अन् अश्विनचं भन्नाट उत्तर; वाचा