भारतात कोरोना व्हायरसचा विळखा पडला आहे. या संकटाचा सामना करत असताना एकीकडे लसीकरणही सुरु आहे. सध्या देशात वयवर्ष 18 च्या पुढील लसीकरण सुरु झाले आहे. त्यामुळे नुकतेच भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने गुरुवारी(६ मे) कोरोना वायरस लसीचा पहिला डोस घेतला आहे. याबद्दल त्याने स्वत: माहिती दिली आहे.
धवनने स्वतः लस घेतल्याचे फोटो ट्विट केले आहे. धवन आयपीएल 2021 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचा सदस्य होता. खेळाडूंना कोरोना होत असल्याकारणाने मंगळवारी आयपीएल 2021 स्पर्धा रद्द करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसातच धवनने कोरोनाची लस घेतली आहे.
धवनने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले, ‘मी लस घेतली आहे. सर्व कोरोना योद्धांचे त्यांच्या बलिदानासाठी केवळ आभार मानणे पुरेसे नाही. कृपया अजिबात संकोच न करता लवकरात लवकर लस घ्या. हेच (लस) आपल्याला कोरोनाच्या या विषाणूला पराभूत करण्यासाठी मदत करेल.”
Vaccinated ✅ Can’t thank all our frontline warriors enough for their sacrifices and dedication. Please do not hesitate and get yourself vaccinated as soon as possible. It’ll help us all defeat this virus. pic.twitter.com/0bqBnsaWRh
— Shikhar Dhawan (@SDhawan25) May 6, 2021
धवन कदाचित भारतीय संघातील पहिलाच खेळाडू असेल, ज्याने लसीचा डोस घेतला आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मार्चच्या पहिल्या आठवड्यात लस घेतली होती. त्यावेळी 45 वर्षांवरील लोकांना लस देण्यात येत होती. सरकारने 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यास सुरूवात केली आहे.
दरम्यान धवनच्या आयपीएल 2021 मधील कामगिरीचा विचार केला असता त्याने शानदार कामगिरी केली. धवनने खेळलेल्या 8 सामन्यात 380 धावा केलेल्या होत्या. यादरम्यान त्याने 3 देखील अर्धशतक झळकावली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
पुन्हा भेटू, काळजी घ्या! भारताचा निरोप घेताना हळहळली दिग्गजांची मनं; एकाने तर मागितली माफी