सध्या आशिया चषक 2023 स्पर्धे सुरू आहे. भारत, पाकिस्तान श्रीलंका आणि बांगलादेश यांसारख्या संघांनी सुपर-4 फेरीत एन्ट्री केली आहे. आता हे संघ आपसात भिडताना दिसतील. या स्पर्धेत 10 सप्टेंबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमने-सामने असतील. या दोन संघातील पहिला सामना 2 सप्टेंबर रोजी खेळला गेला होता. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना रद्द झाला होता. त्यानंतर आता चाहत्यांच्या नजरा 10 सप्टेंबरच्या भारत-पाकिस्तान सामन्यावर लागल्या आहेत. अशातच आयसीसीने वनडे रँकिंग जाहीर केली आहे. या रँकिंगमध्ये शुबमन गिल याने आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत मोठा कारनामा केला आहे.
आयसीसी वनडे रँकिंगमध्ये बाबर आझम अव्वलस्थानी
शुबमन गिल वनडे रँकिंगमध्ये (Shubman Gill ODI Ranking) चमकला आहे. त्याच्या क्रमवारीत फक्त सुधारणाच झाली नाही, तर त्याने पाकिस्तानी फलंदाजांनाही पछाडले आहे. आयसीसीने जारी केलेल्या क्रमवारीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) अजूनही यादीत अव्वलस्थानी आहे. त्याची रेटिंग 882 झाली आहे. यापूर्वी ही रेटिंग 877 इतकी होती. त्याने नेपाळविरुद्ध खेळलेल्या 151 धावांच्या शतकी खेळीमुळे तो अव्वलस्थानी कायम असून त्याच्या रेटिंगमध्येही सुधारणा झाली आहे. पावसामुळे त्याला भारतीय संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
Asia Cup stars have sparkled in the latest @MRFWorldwide ICC Men’s ODI Player Rankings 💥
More 👇 https://t.co/VEAX5KQOPg
— ICC (@ICC) September 6, 2023
यादीत दुसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रासी वान डर दुसेन आहे. त्याच्या रेटिंगमध्ये कोणताही बदल झाला नसून त्याची रेटिंग 777 इतकी आहे. अशातच शुबमन गिल याने कमाल केली आहे. तो या यादीत आधी पाचव्या स्थानी होता. मात्र, तो आता तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. शुबमनची रेटिंग वाढून 750 झाली आहे. आधी त्याची रेटिंग 743 इतकी होती.
इमाम उल हकला पछाडत पटकावले तिसरे स्थान
शुबमन गिल याने नेपाळविरुद्ध खेळल्या गेलेल्या आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत 62 चेंडूत 67 धावा केल्या होत्या. याचेच बक्षीस त्याला आयसीसी रँकिंगच्या रूपात मिळाले. त्याने पाकिस्तानच्याच इमाम उल हकला मागे टाकले आहे. तो आधी तिसऱ्या स्थानी होता. नेपाळविरुद्ध त्याला काही खास कामगिरी करता आली नव्हती. तसेच, भारताविरुद्धही तो फलंदाजी करू शकला नव्हता. इमाम आधी 748 रेटिंगसह तिसऱ्या स्थानी होता, पण आता त्याची रेटिंग 732 झाली असून तो चौथ्या स्थानी घसरला आहे.
विराट दहाव्या, तर रोहित 11व्या स्थानी
आयर्लंडचा फलंदाज हॅरी टेक्टर हा यादीत 726 रेटिंगसह पाचव्या स्थानी आहे. तसेच, डेविड वॉर्नर याचीही रेटिंग टेक्टरइतकीच आहे. याव्यतिरिक्त पाकिस्तानचा फखर जमान 721 रेटिंगसह सातव्या, दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक 718 गुणांसह आठव्या आणि स्टीव्ह स्मिथ 702 रेटिंगसह नवव्या स्थानी आहे. तसेच, भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली यादीत दहाव्या स्थानी आहे. त्याची रेटिंग 695 इतकी आहे, जी आधी 705 इतकी होती. विराट पाकिस्तानविरुद्ध आशिया चषकात 4 धावांवर धावबाद झाला होता. यानंतर नेपाळ संघाविरुद्धही त्याला फलंदाजीची संधी मिळाली नव्हती. तसेच, नेपाळविरुद्ध अर्धशतक ठोकणारा रोहित शर्मा यादीत 11व्या स्थानी आहे. त्याची रेटिंग 690 इतकी आहे. (indian cricketer shubman gill has moved to no 3 in the odi rankings know rating here)
हेही वाचाच-
Asia Cup 2023: सुपर- 4मधील पहिल्या सामन्यात बांगलादेश ‘टॉस का बॉस’, पाहा दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
नाद केला पण पुरा केला! 2023मध्ये कर्णधार म्हणून ‘अशी’ जबरदस्त कामगिरी एकट्या रोहितलाच जमली, वाचाच