ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर झालेला तिसरा कसोटी सामना सोमवारी (११ जानेवारी) अनिर्णित राखण्यात भारतीय संघाने यश मिळवले. या सामन्यात चौथ्या दिवसापर्यंत ऑस्ट्रेलियन संघाचे वर्चस्व होते. पण सोमवारी सामन्याच्या पाचव्या दिवशी भारतीय संघाने धैर्य दाखवले आणि सामना अनिर्णित राखला. त्यातही यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने दुखापतीनंतर लढावू वृत्ती दाखत धमाकेदार फलंदाजी केली. त्यामुळे आजी-माजी क्रिकेटपटूंकडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
भारताने चौथ्या दिवसाखेर रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांच्या महत्त्वपुर्ण विकेट्स गमावल्या होत्या. त्यानंतर २ बाद ९८ धावांपासून पुढे पाचव्या दिवसाची सुरु झाली. फलंदाजी करत असलेल्या चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्याकडून संघाला मोठ्या अपेक्षा होत्या. परंतु, ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू नॅथन लायनने अवघ्या ४ धावांवर रहाणेला झेलबाद करत सर्वांच्या आशेवर पाणी फेरले.
मात्र पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या पंतने डावाला चालना दिली. त्याने ११८ चेंडूत ९७ धावांची तूफानी खेळी केली. दरम्यान ३ खणखणीत षटकार सोबतच १२ चौकार ठोकले. याबरोबरच त्याने पुजारासोबत मिळून चौथ्या विकेटसाठी १४८ धावांची शतकी भागीदारी उभारली. अखेर दुसऱ्या सत्रात तो नॅथन लायनच्या फिरकीत फसला आणि पॅट कमिन्सच्या हाती झेल देत बाद झाला.
परंतु पंतच्या दमदार खेळीचा विसर न पाडताचाहत्यांसह अनेक क्रिकेटपटूंनी त्याची प्रशंसा केली.
आजी-माजी खेळाडूंकडून रिषभ पंतचे कौतुक-
भारताचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग याने मीम शेअर करत हटके अंदाजात पंतची पाठ थोपटली.
Pic1 – Till Rishabh Pant was at the crease.
Pic2- Pujara, Vihari and Ashwin.And the combination of these 2 made it a fantastic Test Match. Feel so so proud of the Team,
Pant showed why he needs to b treated differently & d grit showed by Vihari, Pujara & Ashwin was unbelievable pic.twitter.com/aU3qN6O3JF— Virender Sehwag (@virendersehwag) January 11, 2021
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याने पंत आणि पुजाराच्या दमदार भागिदारीची प्रशंसा केली. पंत आणि पुजाराचा फोटो शेअर करत सचिनने लिहिले की, “आपल्या हाताच्या पाच बोटांमधील प्रत्येक बोट वेगवेगळे काम करत असते. अगदी याचप्रमाणे रिषभ पंत आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारतीय संघासाठी योगदान दिले आहे.”
सोबतच सचिनने #ONETEAMONECAUSE असा हॅशटॅग दिला आहे. अर्थातच सचिनला असे म्हणायचे आहे की, एका संघाने सोबत मिळून काम केले तर त्याचा एक चांगला परिणाम शेवटी मिळतो.
On our hand each finger does a different job, and that’s exactly what @cheteshwar1 and @RishabhPant17 did for #TeamIndia. Wonderful partnership.#ONETEAMONECAUSE#AUSvIND pic.twitter.com/sUEwWXXvYj
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 11, 2021
Really proud of #TeamIndia!
Special mention to @RishabhPant17, @cheteshwar1, @ashwinravi99 and @Hanumavihari for the roles they’ve played brilliantly.
Any guesses in which dressing room the morale will be high? 😀#OneTeamOneCause #AUSvIND pic.twitter.com/hG60Iy6Lva
— Sachin Tendulkar (@sachin_rt) January 11, 2021
माजी भारतीय फलंदाज सुरेश रैना यानेही पंतला “चांगला खेळलास भावा”, असे म्हणत त्याचे कौतुक केले आहे.
Well played brother ! 🙌❤️ https://t.co/XCMcSUvCjN
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) January 11, 2021
भारताचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू इरफान पठाण याने हटके शब्दात पंतवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. “पंत तुझ्याबद्दलचे अनेक प्रश्न आता शांततेत विसावले असतील”, असे ट्विटमध्ये लिहिले आहे.
Many questions must be resting in peace for now… #RishabhPant
— Irfan Pathan (@IrfanPathan) January 11, 2021
A sensational knock from @RishabhPant17 comes to an end just 3 short of a century. The Pujara-Pant partnership was worth 148 runs #TeamIndia #AUSvIND
Australia take the new ball.
Details – https://t.co/C5z4LWkpXi pic.twitter.com/eTRrCtmYWM
— BCCI (@BCCI) January 11, 2021
😭😭😭😭😭😭😭😭😭#RishabhPant departs for 97 in an anti-climax no Indian fan awake right now wanted to see.
An amazing counter-attacking knock comes to an end. Well played, @RishabhPant17 👏🏼👏🏼👏🏼#AUSvIND pic.twitter.com/uRcL7Hek0f
— Delhi Capitals (@DelhiCapitals) January 11, 2021
कसोटी मालिकेचा निकाल चौथ्या सामन्यावर अवलंबून
तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारत-ऑस्ट्रेलिया संघातील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना १५ जानेवारीपासून सुरु होणार आहे. ब्रिस्बेनच्या गाब्बा स्टेडियमवर हा सामना होणार असून १९ जानेवारी रोजी या सामन्यासह मालिका आणि दौराही संपेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘मैं तो तेरे को हरामी समझता था, तू तो देव मानुष निकला रे’, पंतच्या धमाकेदार खेळीनंतर मीम्सचा पाऊस
“हाताचं प्रत्येक बोट वेगवेगळं काम करत, अगदी तसंच..” सचिनकडून पुजारा-पंतवर कौतुकाची थाप