भारत-ऑस्ट्रेलिया संघात ऍडलेड येथे झालेला दिवस- रात्र कसोटी सामना शनिवारी (१९ डिसेंबर) ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून जिंकला. यासह यजमान ऑस्ट्रेलिया संघ मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. या पराभवानंतर इंग्लंडचे माजी दिग्गज कर्णधार मायकल वॉन यांनी भारतीय संघाची चेष्टा केली. त्यानंतर भारतीय चाहत्यांनी त्यांना जबरदस्त ट्रोल करत चांगला धडा शिकवला.
पहिल्या कसोटी सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर वॉन यांनी ट्वीट करत भारतीय संघाला टोमणा मारला. “सांगितले होते ना… या कसोटी मालिकेत भारत ४-० ने पराभूत होणार आहे,” असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले.
Told ya … India are going to get hammered in the Test Series … #AUSvIND #4-0
— Michael Vaughan (@MichaelVaughan) December 19, 2020
वॉन यांच्या या वक्तव्यानंतर भारतीय चाहत्यांना त्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी वॉन यांच्या ट्विटवर तिखट प्रतिक्रिया दिल्या. “दुसऱ्या कसोटी सामन्यात तुम्हाला पराभवाचे चांगलेच प्रत्युत्तर मिळेल. तुम्ही काळजी करू नका. भारताने गुलाबी चेंडू कसोटी खेळण्याची ही पहिली वेळ होती. तुम्ही आता फक्त वाट पाहा,” असे चाहत्याने म्हटले. त्यानंतर दुसऱ्या एका चाहत्याने “इंग्लंड आणि भारत संघात होणाऱ्या येत्या कसोटी मालिकेत तुमची चांगलीच धिंड निघेल,” अशी कमेंट केली.
You'll get the answer in the next test. Don't worry. It was the first time they played the pink ball test. Just wait and watch. #India
— Akshay Srivastav (@iakshaysrivastv) December 19, 2020
https://twitter.com/joyaired/status/1340215244946165760?s=20
https://twitter.com/imasmit/status/1340215445287129088?s=20
https://twitter.com/Shoaib15259041/status/1340215236880560128?s=20
https://twitter.com/aayushs61244561/status/1340217004683227137?s=20
#Rohit #hitman is coming soon pic.twitter.com/x1yqS744NV
— aayush punjabi (@PunjabiAayush) December 19, 2020
यापूर्वी केली होती मोठी भविष्यवाणी
महत्त्वाचे म्हणजे, याच वॉन यांनी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा श्रीगणेशा होण्यापूर्वी भारतीय संघ ४-० ने मालिका गमावेल असा अंदाज वर्तवला होता.
एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत वॉन यांनी स्पष्ट केले होते की, “दोन वर्षांपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात आला होता, तेव्हा खूपच मजबूत होता. भारताकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि आर अश्विनसारखे गोलंदाज होते तसेच फलंदाजीत ‘द वॉल’ चेतेश्वर पुजारादेखील होता. हे सर्व खेळाडू ऑस्ट्रेलियावर वरचढ ठरत होते.”
“भारतीय संघ २०१८ मध्ये यशस्वी होण्याचे कारण स्टिव्ह स्मिथ, डेविड वार्नर आणि मार्नस लॅब्यूशाने हे खेळाडू संघात नव्हते. परंतु आता ऑस्ट्रेलिया मजबूत कसोटी संघ आहे. त्यांनी इंग्लंडला इंग्लंडमध्ये बरोबरीत रोखून ऍशेस आपल्याकडे ठेवली होती. भारताला या वेळी मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड आणि पॅट कमिन्स या तिकडीचा सामना करावा लागेल. कुकाबुरा चेंडूने ते भारतीय फलंदाजांना धावा बनवू देणार नाहीत. त्यामुळे या मालिकेत ऑस्ट्रेलिया भारताला व्हाईटवॉश देईल,” असे वॉन यांनी म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
…तर ऑस्ट्रेलिया ४-० ने मालिका जिंकेल, माजी दिग्गज कर्णधाराची भविष्यवाणी
“..म्हणून त्यांना लक्ष्य करणे चुकीचे”; सुनील गावसकरांनी केली भारतीय फलंदाजांची पाठराखण