मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाहुण्या भारतीय संघात अत्यंत रोमांचक लढत चालू आहे. या ऐतिहासिक ‘बॉक्सिंग डे’ सामन्याच्या पहिल्या डावात भारताने १३१ धावांनी आघाडी घेतली आहे. प्रत्युत्तरात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलिया संघ भारताचे आव्हान पूर्ण करण्यासाठी झगडत आहे. या डावादरम्यान भारतीय संघासाठी एक वाईट बातमी पुढे आली आहे. त्यांचा वेगवान गोलंदाज उमेश यादवला डावादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे त्याचे षटकही तो अर्ध्यात सोडून मैदानाबाहेर पडला.
असी झाली उमेश यादवला दुखापत
भारताचे १३१ धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर जो बर्न्स आणि मॅथ्यू वेड सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. पण यादवने त्याच्या दुसऱ्याच षटकात बर्न्सला झेलबाद करत संघाला पहिली विकेट मिळवून दिली. त्यानंतर पुढील तिसऱ्या षटकातही अवघ्या दोन धावा दिल्या. परंतु, त्याच्या चौथ्या आणि डावातील आठव्या षटकातील तिसरा चेंडू टाकत असताना त्याच्या पोटरीमध्ये ताण आल्याचे दिसले. त्यामुळे मैदानावरच तो लंगडू लागला.
त्यानंतर लगेचच भारतीय संघाचे फिजिओ मैदानावर आले आणि त्यांनी यादवचा तपास केला. पण त्याच्या पायाची स्थिती गंभीर दिसत असल्यामुळे त्याला मैदानातून बाहेर घेऊन जाण्यात आले. त्याच्या उर्वरित षटकात युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने गोलंदाजी केली. त्यामुळे आता यादवच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जर त्याची दुखापत गंभीर असल्यास त्याला अर्ध्यातच कसोटी मालिका सोडावी लागू शकते. यामुळे भारतीय संघालाही मोठे नुकसान होईल.
This doesn't look good for Umesh Yadav. He's pulled up gingerly and is hobbling off the field #AUSvIND pic.twitter.com/ncOESNol2m
— 7Cricket (@7Cricket) December 28, 2020
ऑस्ट्रेलियाने गमावल्या तीन विकेट्स
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील ‘बॉक्सिंग डे’ कसोटी सामन्याचा सोमवारी (२८ डिसेंबर) तिसरा दिवस असून ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावाची सुरुवात फारशी बरी झालेली नाही. ऑस्ट्रेलियाने ३० षटकांमध्ये ३ विकेट्स गमावत ७१ धावा केल्या आहेत. यात जो बर्न्स (४ धावा), मार्नस लॅब्यूशाने (२८ धावा) आणि स्टिव्ह स्मिथ (८ धावा) यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रनआऊट आणि यांच जरा वाकडच! धावबाद न होता सर्वाधिक कसोटी डाव खेळणारे क्रिकेटर
तेव्हा कपिल देव आता रविंद्र जडेजा, फक्त या दोन भारतीयांनाच जमलाय ‘हा’ कारनामा