विराट कोहलीच्या टीम इंडियाला भारतीय फुटबॉल संघाकडून खास शुभेच्छा, पहा व्हिडिओ

इंग्लंड आणि वेल्समध्ये सध्या 12 वी आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा सुरु आहे. या विश्वचषकात भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना 5 जूनला साउथँम्पटन येथे दक्षिण आफ्रिका विरुद्ध होणार आहे.

या विश्वचषकासाठी विराट कोहली कर्णधार असणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला भारतीय फुटबॉल संघाकडून एका खास व्हिडिओतून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

या व्हिडिओतून भारतीय फुटबॉल पुरुष संघाचा कर्णधार सुनिल छेत्री, अनुभवी डिफेंडर संदेश झींगन, गोलकिपर गुरप्रीत सिंग संधू यांनी तर भारतीय फुटबॉल महिला संघाच्या दलिमा छिब्बर आणि गोलकिपर अदिती चौहान यांनी भारताच्या क्रिकेट संघाला 2019 विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या शुभेच्छा देताना झींगन म्हणाला, ‘विश्वचषकासाठी आपल्या भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा. मला खात्री आहे तूम्ही खूप चांगले खेळाल आणि विजेतेपद मायदेशी घेऊन याल.’

तसेच गुरप्रीत सिंग म्हणाला, ‘मी तूम्हाला शुभेच्छा देतो. आम्हाला खात्री आहे तूम्ही आपल्यासाठी हे विजेतेपद मिळवाल. मनापासून खेळा आणि विश्वचषक मायदेशी आणा.’

विराटबरोबर चांगली मैत्री असणारा कर्णधार छेत्री म्हणाला, ‘विराट तूला आणि संपूर्ण संघाला शुभेच्छा. आम्ही तूमचाच भाग आहोत. चांगले खेळा. दुखापतीपासून लांब रहा आणि विश्वचषकाची मजा घ्या.’

त्याचबरोबर भारतीय फुटबॉलच्या महिला संघातील दलिमा आणि अदिती यांनीही भारतीय क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना विश्वचषक मायदेशी आणा, असा संदेश दिला आहे.

भारतीय फुटबॉल संघ किंग्स कप स्पर्धेत खेळण्यासाठी सध्या थायलंड दौऱ्यावर आहे. त्यांचा पहिला सामना 5 जूनला कुराकाओ विरुद्ध होणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

विश्वचषक २०१९: पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाचा हा खेळाडू झाला फिट, पण खेळण्यावर अजूनही प्रश्नचिन्ह

…म्हणून विराट कोहलीने २०१७नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणे सोडले

विश्वचषक २०१९: दक्षिण आफ्रिकेला मोठा झटका, भारताविरुद्ध खेळणार नाही हा मोठा खेळाडू

You might also like

Leave A Reply