जगभरात रस्ता सुरक्षा जागरुकता पसरवण्यासाठी मार्चमध्ये अनअकॅडेमी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज खेळली जाणार आहे. यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे. या सीरिजची विशिष्ट बाब ही आहे की, यात जगभरातील दिग्गज क्रिकेटपटू खेळणार आहेत. यात सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा आणि ब्रेट ली यांचा समावेश आहे. अशात 12 सदस्यांचा भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.
भारतीय संघात सचिन आणि विरेंद्र सेहवागची सलामीची जोडी भारतीय क्रिकेटप्रेंमीना पुन्हा पाहायला मिळणार आहे. या सीरिजचा पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. यावेळी सचिन भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे.
याचबरोबर भारतीय संघात युवराज सिंग, झहीर खान यांचा समावेश आहे. तसेच, इरफान पठाण आणि अजित आगरकर पुन्हा गोलंदाजी करताना दिसणार आहेत. याव्यतिरिक्त, भारताकडून 6 कसोटी आणि 23 वनडे खेळलेले समीर दिघे यष्टीरक्षण करणार आहेत.
या सीरिजमध्ये एकूण 11 सामने होणार आहेत. हे सामने पुण्यातील एमसीए स्टेडियम, नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि सीसीआय (क्रिकेट क्लब ऑफ इंडिया) येथील ब्रेबोन स्टेडियमवर होणार आहेत.
सीरिजचा पहिला सामना इंडिया लिजंड्स आणि वेस्ट इंडिज लिजंड्स यांच्या दरम्यान होणार आहे. हा सामना 7 मार्च रोजी वानखेडे स्टेडियम येथे होईल. तर, अंतिम सामना हा 22 मार्च रोजी ब्रेबोन स्टेडियमवर खेळला जाईल.
असा असेल भारतीय संघ:
सचिन तेंडुलकर (कर्णधार),विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, समीर दिघे, इरफान पठान, अजित आगरकर, झहीर खान, संजय बांगर, मुनाफ पटेल, मोहम्मद कैफ, प्रज्ञान ओझा आणि सैराज बहुतुले.
संपूर्ण यादी – शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा; ४८ खेळाडूंना मिळणार पुरस्कार
वाचा????https://t.co/zf2sTyIvRA????#म #मराठी #ShivChhatrapatiAward— Maha Sports (@Maha_Sports) February 19, 2020
न्यूझीलंडचा हा मोठा खेळाडू पहिल्या कसोटीला मुकण्याची शक्यता…
वाचा- ????https://t.co/mvGvqpEGOv????#म #मराठी #Cricket #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) February 19, 2020