क्रिकेटविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय मूळ असलेले दक्षिण आफ्रिका संघाचे वेगवान गोलंदाज हुसेन अयूब यांचे निधन झाले आहे. दीर्घ आजाराने त्यांची वयाच्या ८१ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. वर्णद्वेषाच्या धोरणामुळे ते कधीही दक्षिण आफ्रिकेकडून खेळू शकले नाहीत. शनिवारी (दि. ०७ मे) पोर्ट एलिझाबेथ येथे किडनीच्या आजाराशी झुंज देत त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने क्रिकेट जगतावर शोककळा पसरली आहे. (Hussain Ayub Passes Away)
हुसेन अयूब (Hussain Ayub) हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील महान खेळाडूंपैकी एक होते. त्यांना वर्णद्वेषाच्या धोरणामुळे देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी देण्यात आली नाही. त्यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यात अनेक समस्यांचा सामना केला. याचा उल्लेख त्यांनी २०२०मध्ये आलेले आपले पुस्तक ‘क्रॉसिंग बाऊंड्रीज’ यामध्ये केला आहे. विशेष म्हणजे, या पुस्तकाची प्रस्तावना ही वेस्ट इंडिजचे दिग्गज माजी कर्णधार क्लाईव्ह लॉयड यांनी लिहिली होती.
युनायटेड क्रिकेट बोर्डाच्या (सध्याचे क्रिकेट दक्षिण आफ्रिका) स्थापनेनंतर, दक्षिण आफ्रिकेला पुन्हा आंतरराष्ट्रीय मैदानात आणण्यात आले आणि अयूब यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या विकास समितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. अयुबने प्रशिक्षकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारीही घेतली आणि आयुष्यातील शेवटचे दशक आफ्रिकेत क्रिकेट हा खेळ विकसित करण्यात घालवले.
अयूब यांच्याबद्दल खास गोष्ट म्हणजे, ते व्यवसायाने शिक्षक होते. त्यांनी आफ्रिकन खंडातील हजारो मुलांमध्ये क्रिकेटची आवड निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन केले. किडनीच्या आजारामुळे डायलिसिसच्या वेळी त्यांना जो भावनिक, शारीरिक आणि मानसिक त्रास झाला, त्यावर ते त्यांच्या ‘माय लास्ट इनिंग्ज’ या दुसऱ्या पुस्तकावर काम करत होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘माझ्यासोबत योग्य झालं नाही, मला वाईट वागणूक दिली’, आयपीएलबद्दलच्या भावनांना ख्रिस गेलकडून मोकळी वाट
‘त्यांना माझी गरज आहे, मी येतोय’; आयपीएल पुनरागमनाबद्दल ‘युनिव्हर्स बॉस’ गेलचे मोठे विधान