भारतीय संघाच्या मायदेशातील द्विपक्षीय मालिकांचे प्रसारण हक्क देण्यासाठी बीसीसीआयने नुकतीच निविदा मागवली आहे. 2028 च्या अखेरीपर्यंत होणाऱ्या या मालिकांसाठी हे हक्क असतील. आता या एकूण प्रक्रियेतील सामन्यांची आकडेवारी समोर आली असून, यादरम्यान भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या मजबूत संघांविरुद्ध जास्तीत जास्त सामने खेळेल.
काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने मागवलेल्या या निविदेसाठी 25 ऑगस्टपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. यासाठी बोली लावणाऱ्यांना पंधरा लाख रुपये नॉन रिफंडेबल रक्कम जमा करावी लागेल. प्रतिसामना 45 कोटी इतकी आधारभूत किंमत यासाठी ठेवली आहे. या संपूर्ण सायकलमधील सामन्यांची संख्या आणि सामन्यांचे महत्त्व लक्षात घेता, यासाठी मोठी बोली लागण्याची शक्यता आहे.
सध्या बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण सायकलमध्ये भारतीय संघ मायदेशात एकूण 88 सामने खेळणार आहे. यातील तब्बल 39 सामने हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बिग थ्रीचा भाग असलेल्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होतील.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान 2023 ते 2028 या काळात 21 सामने खेळले जाणार आहेत. यामध्ये 5 कसोटी सामने, 6 वनडे सामने आणि 10 टी20 सामने खेळले जातील. तर इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ तब्बल 10 कसोटी, 3 वनडे व 5 टी20 सामने खेळेल.
बीसीसीआय प्रसाराला हक्कातून कमीत कमी 4500 कोटी रुपये मिळवू शकते असा अंदाज लावला जात आहे. सध्या हे हक्क स्टार समूहाकडे असून, यावेळी त्यांना जिओ, सोनी टीव्ही तसेच नेटवर्क 18 हे टक्कर देऊ शकतात. विश्वचषकाआधी होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेतून या प्रसारण हक्काला सुरुवात होईल. तर, 2028 च्या अखेरीस इंग्लंडच्या दौऱ्यानंतर हा करार संपेल.
(Indian Play 88 Matches In Next Home Cycle 39 Against England And Australia)
महत्वाच्या बातम्या:
रिटायर झाल्यानंतर ब्रॉडने सांगितले सध्याच्या सर्वोत्तम गोलंदाजाचे नाव, म्हणाला, “त्याचा रनअपच भारी”
‘मी पुढील 2 महिन्यात…’, काऊंटी क्रिकेटमधून घेतलेल्या ब्रेकविषयी रहाणेचा मोठा खुलासा