fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

भारताचे ३ असे क्रिकेटर; जे खेळू शकतात शेवटचा आशिया चषक, तिसरे नाव आहे धक्कादायक

Indian Player Last Asia Cup 2020

– सिद्धेश्वर बोरगे

कोरोना व्हायरसमुळे यावेळी सप्टेंबरमध्ये होणारा आशिया चषक खेळला जाणार नाही. मात्र पीसीबीचे प्रयत्न पाहून आशिया चषक २०२० खेळला जाईल, असे दिसून येते. तथापि, ते कधी खेळले जातील हे अद्याप स्पष्ट केलेले नाही.

हा आशिया चषक २०२० मध्ये खेळला गेला, तर काही भारतीय खेळाडूंसाठी हा शेवटचा आशिया चषकही असू शकतो. पुढील आशिया चषक २०२२ मध्ये खेळला जाणार आहे. त्यावेळी त्याच खेळाडूला विश्वचषक २०२३ मध्ये खेळण्याचा आपला दावा आणखी मजबूत करण्याची संधी मिळेल, ज्यात काही खेळाडू मागे दिसत आहेत.

आज या लेखात आपण त्या ३ भारतीय खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत. ज्यांचा हा शेवटचा आशिया चषक असू शकतो. जे की त्यांच्या वयाच्या कारणामुळे असू शकते. त्याशिवाय त्यांच्या प्रदर्शनाची ही यात महत्त्वाची भूमिका असू शकते. या यादीतील काही खेळाडू सध्या संघात महत्वाची भूमिका बजावत आहेत.

१. शिखर धवन

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनचा (Shikhar Dhawan) हा अखेरचा आशिय चषकदेखील असू शकतो. त्याची तंदुरुस्ती व वय पाहता, एक गोष्ट स्पष्ट होते, की पुढील २ वर्षे तो भारतीय संघात सतत स्थान मिळवू शकेल. या शर्यतीत अनेक प्रतिभाशाली युवा खेळाडू दिसतात. ज्यामुळे शिखर धवनची जागी धोक्यात आहे.

शिखर धवनने भारतीय संघासाठी आतापर्यंत १३६ वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४५.१४ च्या सरासरीने ५६८८ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये १७ शतके आणि २९ अर्धशतकांचा समावेश आहे. दरम्यान, त्याचा स्ट्राइक रेट ९४.०२ आहे, तर धवनची सर्वोत्तम धावसंख्या १४३ धावा आहे.

धवनचा खेळ आता नक्कीच चांगला आहे. पण त्याच्या तंदुरुस्तीने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तो सध्या ३४ वर्षांचा आहे. पुढील दोन वर्षांत तो ३६ वर्षांचा होईल. जेथे फिटनेस खूप महत्वाची असेल. पृथ्वी शॉ, केएल राहुलचा खेळ पाहता त्याचा मार्ग अजूनच कठीण होईल.

२. भुवनेश्वर कुमार

या यादीत भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) याचे देखील नाव आहे. भुवनेश्वरचा हा अखेरचा आशिया चषक असू शकतो. त्याची तंदुरुस्ती व वय पाहता, एक गोष्ट स्पष्ट आहे की पुढील २ वर्षे तो भारतीय संघात सतत स्थान मिळवू शकेल. गोलंदाजीत त्याला अनेक पर्याय निर्माण झाले आहेत.

भुवनेश्वर कुमारने भारतीय संघासाठी आतापर्यंत ११४ वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ३४.६० च्या सरासरीने १३२ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान, त्याची इकॉनमी ५.०२ राहिली आहे, तर स्ट्राइक रेट ४१.२ चा आहे. दरम्यान, त्याने १ वेळा ५ विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे.

भुवनेश्वरच्या फिटनेसमुळे भारतीय संघासाठी बर्‍याच मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. आता युवा गोलंदाज म्हणून त्याचा पर्यायही संमिश्र होत चालला आहे. ज्यासाठी दीपक चहरकडे पाहिले जात आहे. शार्दुल ठाकूरही आपल्या स्टाईलमध्ये गोलंदाजी करतो. ज्यामुळे भुवनेश्वर हा कदाचितच आशिया चषक २०२० नंतर पुन्हा ही स्पर्धा खेळू शकेल.

३. मोहम्मद शमी

या यादीत आणखी एक भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे (Mohammed Shami) नावही दिसून येते. शमीसाठीदेखील यंदाचा आशिया चषक शेवटचा असू शकतो. संघात स्थान मिळविण्यासाठी त्याची तंदुरुस्ती प्रश्नचिन्ह निर्माण करते. ज्यामुळे त्याचे पुढील दोन वर्षे सतत खेळणे कठीण वाटत आहे.

शमीने आतापर्यंत भारतीय संघाकडून ७७ वनडे सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २५.४२ च्या सरासरीने १४४ विकेट्स घेतल्या आहेत. ज्यामध्ये त्याची इकोनमी ५.५८ च्या दरम्यान आहे, तर त्याचा स्ट्राइक रेट २७.२ आहे. दरम्यान, त्याने एकदा ५ विकेट घेण्याचा पराक्रमही केला आहे.

शमी सध्या संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून खेळत आहे. परंतु अनेक युवा गोलंदाज त्याची जागा घेऊ शकतात. ज्यामध्ये नवदीप सैनी आणि खलील अहमद यांची नावे आहेत. जेव्हा जेव्हा त्यांना संधी दिली तेव्हा त्यांनी ही भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे.

वाचनीय लेख-

-क्रिकेटपटूंना स्वत: देखील आठवावे वाटणार नाहीत असे क्रिकेटर्सचे ७ लाजीरवाणे विक्रम

-टीम इंडियाकडून विश्वचषकात खेळलेले परंतु एकही कसोटी सामना नशिबात नसलेले ५ क्रिकेटर

-आयपीएलमध्ये २.४ करोडो रूपये कमावणाऱ्या ‘या’ खेळाडूचं लग्न झालं मात्र निव्वळ ७.५ रुपयांत

You might also like