भारतीय संघातील काही खेळाडू गुरूवारी (१६ जून) इंग्लंडच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. भारताचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, रिषभ पंत, श्रेयस अय्यर आणि इतर सपोर्ट स्टाफ हे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा सामना झाल्यावर बेंगलोरमधून इंग्लंडला रवाना होणार आहे. याआधी भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू या दौऱ्यास मुकणार आहे.
भारताचा उपकर्णधार- सलामीवीर केएल राहुल (KL Rahul) हा या दौऱ्यास मुकणार आहे. तो आधीच दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संपूर्ण टी२० मालिकेत खेळला नाही. आता तो इंग्लंडच्या संपूर्ण दौऱ्यातून बाहेर पडणार असल्याचे वृत्त पुढे येत आहे. क्रिकबजच्या रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राहुलला जर्मनीला पाठवण्याचे ठरवले आहे.
भारतीय संघाचे सचिव जय शहा यांनी क्रिकबजशी बोलताना म्हटले, “राहुलची दुखापत बरी झाली नसून त्याला पुढील उपचारासाठी जर्मनीला पाठवले जाणार आहे. तो या महिन्याच्या शेवटी किंवा जुलैमध्ये जर्मनीसाठी निघणार आहे.”
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी२० सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी राहुलला संघाचे उपकर्णधारपद दिले होते. तो आता सातही सामन्यात खेळणार नसल्याने बीसीसीआयने त्याच्याजागी कोणत्याही खेळाडूची सध्या निवड केली नाही. तसेच त्याच्या अनुपस्थितीत पंतकडे उपकर्णधारपद जाण्याची शक्यता आहे. पंत सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. पाच सामन्यांच्या या टी२० मालिकेत यजमान संघ २-१ असा मागे आहे.
राहुल संघात नसल्याची कमी भारतीय संघाला जाणवेल. त्याने लॉर्ड्स येथे झालेल्या कसोटी सामन्यात शतक केले होते. हा सामना भारताने १५१ धावांनी जिंकला होता. त्याने इंग्लंच्या २०२१च्या दौऱ्यात ४ कसोटी सामन्यात ३९.३८च्या सरासरीने ४१३ धावा केल्या आहेत. भारताकडून या त्या मालिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक धावा केल्या आहेत.
इंग्लंड दौऱ्यातील भारतीय कसोटी संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, उमेश यादव, प्रसिद्ध कृष्णा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आता दबाव आफ्रिकी संघावर’, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने दिले भारतीय संघाला बळ
अरेरे! दुसऱ्या कसोटी विजयासह मालिकाही खिशात घातलेल्या इंग्लंडला आयसीसीकडून दंड, २ गुणही कापले
‘या’ बाबतीत इंग्लंडला भरावा लागलाय सर्वात जास्त दंड, भारतही काही मागे नाही