विश्वचषक २०२३ स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. रोहित शर्मा आणि भारतीय संघ या स्पर्धेतील एकमेव संघ आहे जो अजुनपर्यंत अजिंक्य आहे. आता भारतीय संघ या स्पर्धेतील आपला सहावा सामना 29 ऑक्टोबर रोजी गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. यासाठी भारतीय संघ लखनऊला पोहोचला आहे. गुरुवारी सर्व खेळाडूंनी त्यांचे पहिले सराव सत्र केले. बीसीसीआयने या सराव सत्राचा एक खास व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये काही आघाडीचे फलंदाज आणि गोलंदाज चेंडूवर आपले पराक्रम दाखवत आहेत.
भारतीय संघाने आपला शेवटचा सामना न्यूझीलंडविरुद्ध धरमशाला येथे खेळला होता, ज्यामध्ये न्यूझीलंड संघाचा 4 विकेट्सने पराभव केला होता. यानंतर भारतीय संघाने तेथे दोन दिवस विश्रांती घेतली आणि बुधवारी रात्री पुढील सामन्यासाठी लखनऊला पोहोचले.
बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जसप्रीत बुमराह (jasprit Bumrah) डाव्या हाताने गोलंदाजी करताना दिसत आहे, तर रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव उजव्या हाताने नेटमध्ये गोलंदाजीचा सराव करताना दिसत आहेत. याशिवाय शुभमन गिल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांनीही आपले गोलंदाजी कौशल्य दाखवले. व्हिडिओच्या शेवटी शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, रविचंद्रन अश्विन हे देखील नेटमध्ये घाम गाळताना दिसले आहेत.
बीसीसीायने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहीले की, “कालच्या सराव सत्रात प्रत्येकाला गोलंदाज व्हायचे होते. प्रत्येकजण सध्या आपलं नशीब आजमावत आहे, बरोबर ना?”
इंग्लंडविरुद्धच्या आगामी सामन्यात हार्दिक पंड्या निवडीसाठी उपलब्ध नसल्याची बाब लक्षात घेण्यासारखी आहे. सध्या तो बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये दुखापतीतून सावरण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात गोलंदाजी करताना अष्टपैलू खेळाडू जखमी झाला होता, त्यामुळे पंड्या न्यूझीलंडविरुद्धचा सामना खेळू शकला नाही. त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवला अंतिम अकरामध्ये स्थान मिळाले होते. त्याला इंग्लंड संघाविरुद्धही खेळण्याची संधी मिळेल, अशी आशा आहे. (Indian players show strength in practice session Major batsmen also bowled see video)
म्हत्वाच्या बातम्या