आयपीएल २०२२ (IPL 2022) ला अजून बराच वेळ असला तरी, आतापासूनच या स्पर्धेचे वारे वाहू लागले आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ या दोन नवीन फ्रेंचायझी पुढच्या हंगामापासून स्पर्धेत सहभागी होणार असल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या दोन नवीन फ्रेंचायजी अहमदाबाद (Ahamadabad franchise) आणि लखनऊ (Lucknow Franchise) या शहरांच्या नावाने असल्या तरी, त्यांची अधिकृत नावे अद्याप ठरलेली नाहीत. लखनऊने फ्रेंचायझीला नाव सुचवण्यासाठी चाहत्यांना विनंती केली होती. आता अहमदाबाद फ्रेंचायझीने देखील संघाचे नाव शोधायला सुरुवात केली आहे.
बीसीसीआयकडून अहमदाबाद फ्रेंचायझीला सर्व मान्यता मिळाल्यानंतर फ्रेंचायझीने स्पर्धेसाठी सर्व तयाऱ्या सुरू केल्या आहेत. माध्यमांतील वृत्तानुसार, फ्रेंचायझीने संघाला आकर्षक नाव सुचवण्यासाठी काही क्रिएटीव एजन्सीसोबत संपर्क साधला आहे. सीवीसी कॅपिटल्सने अहमदाबाद संघाचे मालकी हक्क मिळवले होते. यानंतर झालेला वाद आता मिटला आहे आणि बीसीसीआयने फ्रेंचायझीला हिरवा कंदील दाखवला आहे. फ्रेंचायझीने संघाच्या नावासाठी गुजरात राज्याची संस्कृती आणि युवकांचा विचार करण्याविषयी क्रिएटीव एजन्सीला सांगितले आहे.
अहमदाबाद फ्रेंचायझीने संघाच्या नावासाठी क्रिएटीव एजन्सीसह संपर्क साधला असला, तरी लखनऊ संघाने मात्र एक अनोखा मार्ग स्वीकारला आहे. अधिकृत खात्यावरून सोशल मीडिया पोस्ट करून लखनऊ फ्रेंचायझीने चाहत्यांकडे संघासाठी चांगली नावे सुचवण्यास सांगितले आहे. या उपक्रमातून लखनऊला एखादे चांगले आणि आकर्षक नाव मिळण्याची शक्यता आहे.
माहितीनुसार, हार्दिक पंड्या अहमदाबाद संघाचा कर्णधार बनण्याची पूर्ण शक्यता आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, हार्दिक पंड्या, राशिद खान आणि शुबमन गिल अहमदाबाद फ्रेंचायझीसोबत करारबद्द होणार आहेत. परंतु यासंदर्भात अद्याप कसलीली अधिकृत माहिती दिली गेलेली नाही. तसेच अहमदाबादचा सपोर्ट स्टाफ देखील ठरला आहे, अशी माहिती माध्यमांमध्ये आहे. वृत्तानुसार, इंग्लंडचे माजी फलंदाज विक्रम सोलंकी अहमदाबादचे संचालक बनणार आहेत. तर सपोर्ट स्टाफमध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशीष नेहरा आणि दक्षिण अफ्रिकी दिग्गज गॅरी कर्स्टन यांचा समावेश होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
‘झिरो’मुळे विराटचा सोशल मीडियावर होतोय बाजार, मीम्स व्हायरल करत चाहते साधतायत निशाणा
Video: अंपायरिंग सोपी नसते!! फलंदाजाच्या त्या शॉटमुळे पंचांची उडाली दाणादाण, मग झाले असे काही
ऑल सेट!! लवकरच रंगणार आयपीएल २०२२ स्पर्धेचा लिलाव सोहळा, ‘हे’ खेळाडू होणार मालामाल
व्हिडिओ पाहा –