भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा वनडे सामना आज (२६ मार्च) पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये पार पडणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंड संघाला ६६ धावांनी पराभूत करत भारतीय संघाने १-० ने आघाडी घेतली आहे. तसेच दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरेल तर इंग्लंड संघ बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात असेल. तसेच या मालिकेत चांगली कामगिरी करत भारतीय संघाकडे वनडे क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा पहिल्या स्थानी विराजमान होण्याची संधी असणार आहे.
यापूर्वी झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने ३-१ ने कसोटी मालिका जिंकत आयसीसी कसोटी संघाच्या यादीत पाहिले स्थान पटकावले होते. तसेच या वनडे मालिकेत भारतीय संघाने १ सामना जिंकला आहे. तर पुढील २ सामने जिंकून भारतीय संघ वनडे क्रिकेटमध्ये देखील पहिल्या स्थानी विराजमान होऊ शकतो. आता सध्या इंग्लंड संघ पहिल्या स्थानी आहे, तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे.
भारतीय संघाने जर इंग्लंड संघाला ३-० ने पराभूत केले तर भारतीय संघाला ३ गुणांचा फायदा होईल आणि भारतीय संघ १२० गुणांसह पहिल्या स्थानी जाईल. तसेच मालिका गमावल्यानंतर इंग्लंड संघाला ४ गुणांचा फटका बसेल. इंग्लंड संघ ११९ गुणांसह दुसऱ्या स्थानी येईल.
भारत आणि इंग्लंड यांच्यात मायदेशात खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील सामन्यांमध्ये भारतीय संघाचे पारडे जड आहे. या दोन्ही संघांमध्ये भारतात आतापर्यंत ४८ वनडे सामने खेळले गेले आहेत. यात भारतीय संघाने ३१ वेळेस बाजी मारली आहे. तर इंग्लंड संघाला १६ वेळेस विजय मिळवण्यात यश आले आहे. तसेच एक सामना ड्रॉ राहिला होता.
तसेच या दोन्ही संघांमध्ये मायदेशात ९ वनडे मालिका खेळल्या गेल्या आहेत. यात भारतीय संघाल ६ वेळेस भारतीय संघाला मालिका जिंकण्यात यश आले आहे.तर इंग्लंड संघाने १ मालिका जिंकली आहे.तसेच २ मालिका बरोबरीत सुटल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
कॅप्टन कोहलीचा मोठा किर्तीमान, दिग्गजांना पछाडत वनडेतील ‘या’ विक्रमांत टॉप-५ मध्ये उडी
विराट जिथे विक्रम तिथे! एकाच क्रमांकावर १०,००० वनडे धावा; पाँटिंगची केली बरोबरी
ना सचिन, ना धोनी; पुण्यनगरीत असा विक्रम करणारा विराट कोहली ठरला जगातील पहिला क्रिकेटपटू