---Advertisement---

श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळून भारतीय संघाला नाही काहीही फायदा? ‘हे’ आहे कारण

On: सोमवार, जून 28, 2021 6:34 PM
---Advertisement---

भारताच्या वरिष्ठ संघ इंग्लंडमध्ये असताना, भारताचा आणखी एक संघ जूलै महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या संघाचे नेतृत्व शिखर धवनच्या हाती देण्यात आले असून, दिग्गज भारतीय फलंदाज राहुल द्रविड या संघाचा मुख्य प्रशिक्षक असेल. या दौर्‍यावर संघाला तीन सामन्यांची वनडे आणि तीन टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये युएई येथे टी२० विश्वचषक होईल. त्याआधी, भारताची ही शेवटची टी२० आंतरराष्ट्रीय मालिका असेल. मात्र, या मालिकेतून भारतीय संघाला तितकासा फायदा होणार नाही, असे दिसत आहे.

‘या’ कारणाने भारताला होणार नाही फायदा
श्रीलंकेविरुद्धची मालिका विश्वचषक होण्यापूर्वीची शेवटची टी२० मालिका असल्याने महत्त्वाची मानली जाते. परंतु, श्रीलंकेच्या संघाच्या कामगिरीकडे पाहता त्याचा भारतीय संघाला फारसा फायदा होणार नसल्याचे दिसत नाही. श्रीलंका संघाने ऑक्टोबर २०१९ पासून आतापर्यंत १३ टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यापैकी संघाने १२ मध्ये पराभव स्वीकारताना केवळ एकच सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत संघाची कामगिरी अत्यंत खराब मानली जाऊ शकते.

या दरम्यान संघाने ऑस्ट्रेलिया, भारत, वेस्ट इंडीज आणि इंग्लंडविरुद्ध मालिका खेळल्या आहेत. इतकेच नव्हेतर, या संघाच्या तिन्ही स्वरूपांमधील कामगिरीवर नजर टाकायची झाली तर, श्रीलंकेच्या संघाने शेवटच्या २० पैकी केवळ ३ सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत भारत कमकुवत श्रीलंकेविरूद्ध सामने खेळून कसा फायदा घेतो, हे पहावे लागेल. हा दौरा १३ जुलैपासून सुरू होईल. सर्व सामने हे कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळले जातील.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया

महत्त्वाच्या बातम्या:

म्हणून समालोचन करण्याचा घेतला निर्णय, दिनेश कार्तिकने खास पोस्टसह केला खुलासा

टेनिस चाहत्यांना मोठा झटका, ‘या’ स्टार खेळाडूची टोकियो ऑलम्पिकमधून माघार

सचिन तेंडूलकरनेही केले मान्य, WTC फायनलमध्ये टीम इंडियाची ‘या’ बाबतीत झाली चूक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---