भारतीय संघाचा वरच्या फळीतील दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेत खेळत नाहीये. टी-20 विश्वचषक 2022 मध्ये माजी कर्णधार विराट भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. मागच्या जवळपास तीन वर्षांत धावा करण्यासाठी विराट झगडत होता, पण सध्या तो जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसत आहे. न्यूझीलंड दौऱ्यात विराट खेळणार नसल्यामुळे संघासाठी त्याची गाजा भरून काढणारा फलंदाज आवश्यक आहे. आपण या लेखात अशाच तीन फलंदाजांचा विचार करणार आहोत, जे न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत विराटच्या जागी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतात.
संजू सॅमसन – भारतीय संघाचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) संघासाठी डावाची सुरुवात करू शकतो. तसेच सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर देखील फलंदाजी करू शकतो. तसे पाहिले तर सॅमसन कोणत्याही क्रमांकावर चांगले प्रदर्शन करू शकतो, जे आपण यापूर्वी पाहिले आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातील एकदिवसीय मालिकेत सॅमसन चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. या मालिकेत त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आणि संघाला विजय देखील मिळवून दिला. सध्या सूर्यकुमार यादव संघासाठी चौथ्या क्रमांकावर वादळी खेळी करताना दिसला आहे. अशात सॅमसन तिसऱ्या क्रमांकावर विराटची जागा नक्कीच भरून काठू शकतो.
श्रेयस अय्यर – श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) देखील संघात विराटची जागा भरून काठण्यासाठी दावेदार आहे. त्याने यावर्षीच्या सुरुवातील श्रीलंकेविरुद्ध मायदेशात खेळलेल्या मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. या क्रमांकावर खेळताना त्याने श्रीलंकेविरुद्ध तीन अर्धशतके केली होती. असे असले तरी, 2022 टी-20 विश्वचषकात त्याला राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेले. 2024 साली खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ त्याच्याकडे भविष्यातील महत्वाचा फलंदाज म्हणून पाहत आहे. असात न्यूझीलंडविरुद्ध तो विराटच्या तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो.
दीपक हुड्डा – अष्टपैलू दीपक हुड्डा (Deepak Hooda) देखील विराट कोहलीच्या जागी न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. आयर्लंडविरुद्ध त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक केले होते. असे असले तरी, हुड्डा टी-20 क्रिकेटमध्ये नियमितपणे खेळथाना दिसला नाहीये. टी-20 विश्वचषकात देखील त्याला फक्त एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली होती. अशात न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात हुड्डाला काय भूमिका पार पाडणार हे लवकरच समजू शकेल.
दरम्यान, उभय संघांतील या टी-20 मालिकेत विराटसह कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल देखील उपस्थित नसतील. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) भारताच्या टी-20 संघाचे नेतृत्व करेल. तर एकदिवसीय मालिकेत शिखर धवन (Hardik Pandya ) संघाच्या कर्णधाराची भूमिका पार पाडणार आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत याला उपकर्णधाराची भूमिका दिली गेली आहे. (Indian team has these three players to replace Virat Kohli in New Zeland tour)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऑस्ट्रेलियात लाजिरवाणे कृत्य करणाऱ्या दानुष्का गुणथिलकाला जामीन मंजूर, न्यायालयाच्या ‘या’ अटी मात्र पाळाव्या लागणार
AUS vs ENG | षटकार रोखण्यासाठी एश्टन एगरचा प्रयत्न यशस्वी, व्हिडिओ तुफान व्हायरल