येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. या मोठ्या सामन्याकरिता भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. त्यानंतर तीन दिवसांचा कडक विलागिकरण कालावधी पूर्ण करून शनिवारी (०५ जून) भारतीय संघ मैदानात सराव करण्यासाठी उतरला आहे. याची माहिती कसोटीपटू चेतेश्वर पुजारा याने एका व्हिडिओद्वारे दिली आहे.
भारतीय संघातील मुख्य फलंदाज चेतेश्वर पुजाराने आपल्या इंस्टाग्राम स्टोरी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो सराव करताना दिसून येत आहे. यावरून स्पष्ट होत आहे की, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने भारतीय संघाला सराव करण्याची परवानगी दिली आहे. ‘मिस्टर डिपेंडेबल’ पुजाराने जॉगिंग करत असलेल्या स्टोरीवर कॅप्शन म्हणून, ‘गोल्डन हावर’ आणि ‘लेट्स गो’ असे लिहिले आहे.
भारतीय संघ साउथॅम्प्टनमध्ये आहे. या स्टेडियममध्येच हॉटेल असल्यामुळे भारतीय संघाला तिसऱ्याच दिवशी बाहेर येण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु हे खेळाडू एकमेकांना भेटू शकत नाहीत. खेळाडूंना आपल्या रूममध्येच जिमची देखील सोय करून देण्यात आली आहे.
पुरुष आणि महिला क्रिकेटपट, वेगवेगळ्या वेळी धावण्यासाठी आणि इतर शारीरिक प्रशिक्षण उद्देशाने जिमचा वापरू शकतात. खेळाडूंसाठी कौशल्य प्रशिक्षण काही दिवसांनी लगतच्या सराव मैदानावर सुरू होईल.
Pujara starts training at the Ageas Bowl 🏃♂️
(via cheteshwar_pujara/IG) pic.twitter.com/t6N7VaPFQe
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 5, 2021
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे , हनुमा विहारी, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, केएल राहुल (फिट असेल तर), रीद्धिमान साहा (फिट असेल तर).
राखीव खेळाडू : अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, अर्जन नगवासवाला
असा आहे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी न्यूझीलंड संघ
केन विलियमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डग ब्रेसवेल, डेवोन कॉन्वे, कॉलिन डी ग्रँडहोम, जैकब डफी, मॅट हेनरी, काइल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेनरी निकोलस, एजाज पटेल, रचिन रविंद्र, मिशेल सेंटनेर, टिम साउथी, रॉस टेलर, नील वॅगनर, बीजे वाटलिंग (यष्टिरक्षक), विल यंग.
महत्त्वाच्या बातम्या-
एकेवेळी ३ बाऊंसर हेल्मेटला लागल्यामुळे रडणारा खेळाडू ते भारतीय संघाचा उपकर्णधार ‘अजिंक्य रहाणे’
पुन्हा वातावरण तापलं! श्रीलंकन क्रिकेटपटूंंचा करारावर स्वाक्षरी करण्यास नकार, दिली ‘ही’ धमकी
स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील मुंबईकर खेळाडूच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा, हटली आजीवन बंदी