भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आजपासून (४ ऑगस्ट) ५ कसोटी सामन्यांच्या थरार पाहायला मिळणार आहे. ही मालिका भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण ही विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामातील पहिलीच मालिका असणार आहे. त्यामुळे भारतीय संघ या स्पर्धेला जोरदार सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या मालिकेत भारतीय संघात अनेक महत्वाचे बदल पाहायला मिळू शकतात. असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांच्यासाठी ही मालिका स्वतःला सिद्ध करण्याची शेवटची संधी ठरू शकते.
अजिंक्य रहाणेचे स्थान धोक्यात?
अजिंक्य रहाणे हा भारतीय कसोटी संघाचा उप कर्णधार आहे. परंतु गेल्या काही सामन्यांमध्ये तो साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला आहे. इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत त्याला चांगली कामगिरी करून स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. अन्यथा या संघात असा एक फलंदाज आहे, जो अजिंक्य रहाणेची जागा घेऊ शकतो.
नुकताच इंग्लंडला पोहोचलेला फलंदाज सूर्यकुमार यादव हा मध्यक्रमातील उत्कृष्ट फलंदाज आहे. वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये अप्रतिम कामगिरी केल्यानंतर तो आता कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे अजिंक्य रहाणे जर या मालिकेत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला; तर सूर्यकुमार यादव कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करेल यात काहीच शंका नाही.(Indian vice captain Ajinkya Rahane’s place in danger, This batsman can take the place)
रोहित शर्मा होऊ शकतो उपकर्णधार
भारतीय संघ अजिंक्य रहाणेला बाहेर करण्याचा प्रयत्न करत असेल; तर रोहित शर्माला उपकर्णधारपद देण्यात येऊ शकते. अजिंक्य रहाणे गेल्या काही सामन्यात फ्लॉप ठरत असला तरी देखील त्याने इंग्लंडमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने इंग्लंडमध्ये आतापर्यंत एकूण १७ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने १ शतक आणि ५ अर्धशतकाच्या साहाय्याने ७३१ धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणेने परदेशात फलंदाजी करताना अप्रतिम कामगिरी केली आहे.
भारतीय संघाचे माजी यष्टिरक्षक फलंदाज दीप दासगुप्ता यांनी म्हटले होते की, “मला नाही वाटत की अजिंक्य रहाणे तसाच खेळाडू राहिला आहे, जसा २०१४-१६ मध्ये होता. तो एक असा खेळाडू होता, ज्याला मी मुंबईमध्ये खेळताना पाहिलं होत. वानखेडे स्टेडियमवर पहिलीच सकाळ. खेळपट्टीवर ओलावा होता. त्यावेळी त्या खेळपट्टीवर फलंदाजी करणे म्हणजे वाईट स्वप्नापेक्षा काही कमी नव्हते. परंतु रहाणेने भारतीय संघासाठी खेळण्यापुर्वी ४००० ते ५००० धावा केल्या होत्या. ते ही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना.”
महत्त्वाच्या बातम्या-
ENGvIND: इंग्लंडविरुद्ध दम दाखवत ‘हे’ ४ भारतीय खेळाडू संघाला करुन देणार विजयी सुरू
आरंभ है प्रचंड! नॉटिंघम कसोटीत इंग्लंडला धोबीपछाड देण्यास विराटसेना सज्ज, बघा तयारीचा व्हिडिओ
जडेजा किंवा अश्विनला बाकावर बसवत कोहली ‘या’ शिलेदारावर लावणार डाव, बघा कोण आहे तो?