fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

टेनिसलाही बसला कोरोना व्हायरसचा फटका, ही मोठी स्पर्धा रद्द

लॉस एंजेलिस। जगभरात सध्या कोरोना व्हायरसमुळे भीतीचे वातावरण आहे. त्याचा परिणाम खेळांच्या स्पर्धांवरही होत आहे. नुकताचा कोरोना व्हायरसचा फटका टेनिसलाही बसला आहे. आजपासून अमेरिकेत सुरु होणारी इंडियन वेल्स ही एटीपी मास्टर 1000 आणि डब्ल्यूटीएची स्पर्धा रद्द करण्यात आली आहे.

याबद्दल अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे की कॅलिफोर्नियाच्या आरोग्य विभागाने कोचेला व्हॅलीमध्ये सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. त्यामुळेही स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. तिथे काही कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.

याबद्दल स्पर्धेचे संचालक टॉमी हास म्हणाले, ‘स्पर्धा रद्द झाल्याने आम्ही खूप निराश आहोत, परंतु स्थानिक नागरिक, चाहते, खेळाडू, स्वयंसेवक, प्रायोजक, कर्मचारी, विक्रेते आणि स्पर्धेत सामील असलेल्या प्रत्येकाचे आरोग्य आणि सुरक्षा महत्त्वाची आहे.”

इंडियन वेल्स ही स्पर्धा 4 ग्रँडस्लॅम स्पर्धेनंतर महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या स्पर्धांपैकी एक आहे.

You might also like