भारतीय महिला क्रिकेट संघाने आज झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात ९ गडी राखून शानदार विजय मिळवला. पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला भारतीय गोलंदाजांनी अवघ्या १५७ धावांवर रोखले. आणि त्यानंतर १५८ धावांचे लक्ष्य अगदी सहज पार केले.
सलामीवीर स्मृती मंधाना आणि पूनम राऊत यांनी दुसऱ्या गड्यासाठी अभेद्य भागीदारी करत भारताचा विजय सुनिश्चित केला. यात स्मृती मंधानाने ६४ चेंडूत ८० धावांची नाबाद खेळी केली. या खेळीत तिने एका अतिशय खास विक्रमाला गवसणी घातली. आत्तापर्यंत एकाही पुरुष अथवा महिला क्रिकेटपटूला न जमलेला विक्रम तिने आपल्या नावे केला.
धावांचा पाठलाग करतांना विशेष कामगिरी
धावांचा पाठलाग करताना सलग दहा सामन्यांत अर्धशतक किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड स्मृतीनं आज नावावर केला. विशेष म्हणजे आतापर्यंत एकाही पुरुष किंवा महिला फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. स्मृतीने आजच्या सामन्यात अर्धशतक झळकवताच हा मान तिला मिळाला.
त्यामुळे आता धावांचा पाठलाग करतांना संघासाठी हमखास दमदार कामगिरी करणारी खेळाडू म्हणून स्मृतीचा नावलौकिक झाला आहे. विशेष म्हणजे अवघ्या २४व्या वर्षीच तिने हा मैलाचा दगड गाठला आहे.
Let's take a moment and salute Smriti Mandhana 🙌
She became the first-ever (Male or Female) cricketer to hit 10 Consecutive 50+ Runs while chasing in ODIs 🔥👏#INDvSA #SmritiMandhana pic.twitter.com/ZdPFTjNumW
— Female Cricket (@imfemalecricket) March 9, 2021
दरम्यान, या सामन्यातील विजयासह भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे या मालिकेचा निकाल आता १२ मार्च रोजी खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्याने लागेल.
महत्वाच्या बातम्या:
ऐकलंत का मंडळी! शाहिद आफ्रिदीची मुलगी आहे लईच देखणी, लाईमलाईटपासून ठेवते स्वत:ला दूर
आयसीसी महिला टी२० क्रमवारीत शेफाली वर्माची प्रगती, तर या भारतीय खेळाडूंची घसरण
अबब! वनडेत २३१ च्या फलंदाजी सरासरीने कुटल्या धावा, ही खेळाडू यंदा ठरली प्लेअर ऑफ द मंथ