भारतीय महिला संघ आणि दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यात ५ सामन्यांची एक दिवसीय आंतरराष्ट्रीय मालिका खेळवण्यात येत आहे.तसेच मंगळवारी झालेल्या मालिकेतील दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात भारतीय संघाने ९ गडी राखून मोठा विजय मिळवला आहे. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर काही महिला क्रिकेटपटूंनी डान्स करत आपला जल्लोष साजरा केला आहे. अशातच त्यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
भारतीय महिला क्रिकेटपटूंनी दक्षिण आफ्रिकन संघाविरुद्ध मिळवलेल्या विजयानंतर दक्षिण भारतीय सुपरस्टार विजयच्या ‘मास्टर’ चित्रपटातील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेले ‘वाठी कमिंग’ या गाण्यावर डान्स करून व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
चाहत्यांनी या व्हिडिओला प्रचंड पसंती देत शेअर देखील केले आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटपटू दिव्या, वेदा कृष्णमूर्ती, आकांक्षा कोहली, वीआर वनिथा, ममता माबेन या डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ वेदा कृष्णमूर्ती हिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर पोस्ट केला आहे. तसेच तिने कॅप्शनमध्ये ‘जेव्हा चेन्नईमध्ये असतो तेव्हा…’ असे देखील लिहिले आहे.
सध्या वेदा कृष्णमुर्ती भारतीय संघातून बाहेर आहे. तिला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.
अश्विन,पंड्या आणि कुलदीप यांचेही ‘वाठी कमिंग’ गाण्यावर थिरकले होते पाय
यापूर्वी देखील भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिका सुरू असताना भारतीय संघातील अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या, आर अश्विन आणि फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांनी सराव करत असताना ‘वाठी कमिंग’ या गाण्यावर डान्स करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या व्हिडिओला देखील लाखो लोकांनी पाहिले होते आणि शेअर देखील केले होते.
दक्षिण अफ्रिका महिला संघाविरुद्ध सुरु असलेल्या वनडे मालिकेतील तिसरा सामना १२ मार्चला होणार आहे. सध्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी झालेली आहे. ही मालिका लखनऊ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी, एकाना स्टेडियमवर होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
झारखंडच्या ‘या’ मंदिरात झहीरला सपत्नीक पाहून उसळली चाहत्यांची गर्दी; पाहा फोटो
कसोटी क्रमवारी: रिषभ पंतची पहिल्या १० फलंदाजांमध्ये एन्ट्री; रोहित शर्मासह ‘या’ क्रमांकावर विराजमान
अरेरे! ‘मिस्ट्री स्पिनर’ची फिटनेस साथ देईना, टीम इंडियाकडून खेळण्याचं स्वप्न राहणार अधुरं?