क्रीडाजगतातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार एल्वेरा ब्रिटो यांचे मंगळवारी (दि. २६ एप्रिल) निधन झाले. भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार ब्रिटो यांनी ६०च्या दशकात हॉकी जगतात आपल्या नावाचा डंका वाजवला होता. ब्रिटो यांच्या निधनामुळे क्रीडाविश्वावर शोककळा पसरली आहे.
एल्वेरा ब्रिटो (Elvera Britto) आणि त्यांच्या २ बहिणी रीटा आणि मेई महिला हॉकीमध्ये सक्रिय होत्या. तसेच, १९६० आणि १९६७मध्ये कर्नाटककडून खेळल्या होत्या. यादरम्यान तिन्ही बहिणींनी सोबत ७ राष्ट्रीय किताबांवर आपले नाव कोरले होते. ब्रिटो यांनी ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि जपानविरुद्ध भारताचे नेतृत्व केले होते.
हॉकी इंडियाने व्यक्त केला शोक
हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोमबम निवेदनात म्हणाले की, “एल्वेरा ब्रिटोच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. ती तिच्या काळातील खेळाडूंच्या पुढे होती आणि तिने महिला हॉकीमध्ये खूप काही साध्य केले आणि राज्यात प्रशासक म्हणून या खेळाची सेवा सुरू ठेवली. आम्ही हॉकी इंडिया आणि संपूर्ण हॉकी समुदायाच्या वतीने तिच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अर्जुन पुरस्कार केला होता नावावर
एल्वेरा ब्रिटो यांनी १९६५ साली अर्जुन पुरस्कार आपल्या नावावर केला होता. विशेष म्हणजे, त्या हा पुरस्कार पटकावणाऱ्या दुसऱ्या महिला हॉकी खेळाडू बनल्या होत्या. त्यांच्यापूर्वी १९६१ साली एने लुम्सडेन यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ब्रिटो यांनी आपल्या बहिणींप्रमाणे अजूनही लग्न केले नव्हते. त्यांनी आपल्या हिंमतीवर भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले होते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
व्ही.के.सोनावणे स्मृती चषक हॉकी स्पर्धेत एक्सलन्सी अकादमी संघाला विजेतेपद
एसएनबीपी २८वी नेहरु अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी: २८ वर्षांत प्रथमच पुणे विद्यापीठ अंतिम फेरीत