येत्या २८ जुलैपासून इंग्लंडमध्ये कॉमनवेल्थ गेम्स ही स्पर्धा सुरू होत आहे. भारतीय महिला संघ सध्या बर्मिंघम मध्ये होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स साठी तयारी करत आहे. अशातच आता बीसीसीआयकडून भारतीय महिला संघ जाहिर करण्यात आला आहे. अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरला भारताचे कर्णधार तर फलंदाज स्मृती मंधाना हिला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
🚨 JUST IN: India have named their squad for the 2022 Commonwealth Games! #B2022 https://t.co/ob8rSvhaMa
— ICC (@ICC) July 11, 2022
कॉमनवेल्थ गेम्स २०२२ या स्पर्धेला येत्या २८ जुलैपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघ सामील होणार असल्याची घोषणा बीसीसीआयमार्फत करण्यात आली होती. त्यासाठी आज भारतीय संघाची घओषणा करण्यात आली आहे. मिताली राज हिने निवृत्ती जाहिर केल्यानंतर हरमनप्रीत कौर हिच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपावण्यात आली होती. यामुळे हरमनप्रीत या स्पर्धेत भारताचे नेतृत्व करेल. याशिवाय भारताची स्टार समालीवीर फलंदाज स्मृती मंधाना या स्पर्धेसाठी भारताची उपकर्णधार म्हणून जबाबदारी पार पाडेल.
कॉमनवेल्थ गेम्स २०२२साठी भारतीय महिला संघ:
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, एस. मेघना, तानिया सपना भाटिया (यष्टीरक्षक), यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव, हरलीन देओल, स्नेह राणा.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नावात ‘जोकर’, पण कमाईच्या बाबतीत मात्र बादशाह! सचिन अन् विराटवरही ठरला वरचढ
सनथ जयसूर्याने मानले भारताचा आभार, म्हटला ‘आर्थिक संकटात ते नेहमीच आमच्यासोबत उभे राहिले’
नोवाक जोकोविच विम्बल्डन जिंकल्यावर गवत का खातो? जाणून घ्या कारण