महिला आशिया चषकाचा अंतिम सामना शनिवारी (15 ऑक्टोबर) बांगलादेशमधील सिल्हेट येथे खेळला गेला. भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान झालेल्या सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी वर्चस्व गाजवत श्रीलंकेला 8 गडी राखून पराभूत करत सातव्यांदा आशिया चषक उंचावला. भारतीय संघाने सांघिक कामगिरीच्या जोरावर हा विजय साकार केला. त्यानंतर भारतीय संघाने भन्नाट सेलिब्रेशन केले. मात्र, त्यातही संघाची युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज (Jemimah Rodriguez) हिने केलेला जल्लोष आणि तिचा उपकर्णधार स्मृती मंधानाने केलेला हिरमोड याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Indian Womens Cricket Team Celebration After Asia Cup Win)
सातव्यांदा आशिया चषक आपल्या नावे केल्यानंतर भारतीय संघाने केलेला जल्लोष सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण संघ पाठमोरा उभा दिसतोय. त्यानंतर सर्व खेळाडू कॅमेऱ्याच्या दिशेने आपले चेहरे करतात. काही सेकंद थांबल्यानंतर जोरात डान्स करताना या भारताच्या खेळाडू दिसतायेत.
Post-win vibes, be like 🎉 🙌#TeamIndia | #AsiaCup2022 | #INDvSL pic.twitter.com/LsUG1PxNiO
— BCCI Women (@BCCIWomen) October 15, 2022
त्यातही संघाची फलंदाज जेमिमा रॉड्रिग्ज ही मैदानावर झोपलेली दिसून येते. तर संघातील इतर खेळाडू तिच्या अंगावर सेलिब्रेशनचे साहित्य टाकताना दिसत आहेत. मात्र, त्याचवेळी संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना तिच्या चेहऱ्यावर ते साहित्य टाकते. त्यामुळे जेमिमा तीच्या मागे धावताना दिसत आहे.
या अंतिम सामन्याचा विचार केला गेला तर भारतीय गोलंदाजांपुढे श्रीलंकेच्या संघाचा निभाव लागला नाही. रेणुका ठाकूर, दीप्ती शर्मा व स्नेह राणा यांनी श्रीलंकेचा डाव केवळ 65 धावांवर गुंडाळला. या धावांचा पाठलाग करताना भारताने शफाली वर्मा व जेमिमा रॉड्रिग्ज यांचे बळी गमावत विजयी लक्ष पूर्ण केले. रेणुका ठाकूर हिला सामनावीर तर, संपूर्ण स्पर्धेत शानदार अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या दीप्ती शर्मा तिला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार दिला गेला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आशिया चषकाचा डॉन भारतच! आतापर्यंत खेळलेल्या हंगामात विरोधी संघाना चारली धूळ, आकडेवारी पाहाच
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दोन हुशार आशियाई कर्णधार, ज्यांनी स्वतःच्या संघासाठी दिले अमूल्य योगदान