भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजला क्रिकेट जगतातील दिग्गज फलंदाज म्हणून ओळखले जाते. तिने तिच्या कारकिर्दीत केलेल्या अफलातून कामगिरीने तिचे नाव मोठे केले आहे. ती तिच्या फलंदाजीने नेहमीच सर्वांची मने जिंकत असते, पण यावेळी तिने तिच्या एका ट्विटने सर्वांची मने जिंकली आहेत.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. ज्यामध्ये एक मुलगी क्रिकेट खेळताना दिसत आहे. त्या मुलगी नाव महक फातिमा असे आहे. या व्हिडिओमधील मुलीसाठी मदतीचा हात मागितला आहे. ही मुलगी केरळ राज्यातील एका छोट्या गावातील कोझिकोड येथील आहे. या लहान मुलीचा क्रिकेट खेळत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात प्रसारित होत आहे. ट्विटरच्या माध्यमातून एका चाहत्याने मिताली राजला टॅग करत मदत मागितली आहे. ज्यामध्ये मिताली राजने मन जिंकण्यासारखे उत्तर दिले आहे.
या व्हिडिओमध्ये महक फातिमा फलंदाजी करत जबरदस्त शॉट मारताना दिसून येत आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडिया करती खूप पसंद केला जात आहे. याच दरम्यान एका ट्विटर वापरकर्त्याने मिताली राजला टॅग करत सांगितले की, मिताली राज या मुलीला तुमच्या पाठिंब्याची आणि आशीर्वादाची गरज आहे.
Tweet of the day! @M_Raj03 she needs your support & blessings!! Thanks @thebetterindia for sharing it. https://t.co/bG29qo3t1m
— KunalSarangi (Modi Ka Parivar) (@KunalSarangi) June 12, 2021
त्याला उत्तर देत मिताली राज म्हणाली की, ‘या मुली सोबत माझा आशीर्वाद आणि माझा पाठिंबा दोन्ही असेल.’ त्याचबरोबर मिताली राज पुढे म्हणाली की, ‘खेळाला पुढे आणणाऱ्या सर्व इच्छुक छोट्या मुलींसोबत माझा आशीर्वाद नेहमीच असेल. या मुलीच्या आई-वडिलांना कोणतीही गरज लागली तर ते थेट माझ्याशी संपर्क करू शकतात.’
She has both my support and blessings . All little girls keen to pursue the sport always have my blessings. Her parents can DM me regarding any assistance they need .
— Mithali Raj (@M_Raj03) June 13, 2021
मिताली राजचे हे उत्तर पाहून ट्विटर वापरकर्त्याने तिचे आभार मानले आणि पुढे म्हणाला की, ‘मी आताच हा तुमचा संदेश मुलीच्या आई-वडिलांना पर्यंत पोहचतो आणि तुम्हाला इंग्लंड दौऱ्यासाठी खूप खूप शुभेच्छा.’
Thanks a ton😊!! Wil convey the message to her parents. And good luck for 🏴!
— KunalSarangi (Modi Ka Parivar) (@KunalSarangi) June 13, 2021
मिताली राज सध्या भारतीय महिला संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. भारतीय महिला संघाला इंग्लंड दौऱ्यावर एक कसोटी सामना, तीन एकदिवसीय सामने व तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. भारत आणि इंग्लंडमध्ये 16 जूनपासून कसोटी सामना सुरु होणार आहे. मिताली राज कसोटी सामना, एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर टी20 मालिकेत हरमनप्रीत कौर भारतीय संघाचे नेतृत्व करेल. मितालीने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
जगभरात आपल्या फलंदाजीचा डंका वाजवलेल्या गावसकरांसाठी भारतातील ‘ही’ खेळपट्टी ठरली होती त्रासदायक
कोहली-रोहित नाही तर ‘या’ भारतीय खेळाडूकडून महिला क्रिकेटपटूंना घेतल्या इंग्लंड दौऱ्यासाठी टिप्स