---Advertisement---

WT20 World Cup; भारतीय संघाचे टी20 वर्ल्ड कपचे स्वप्न भंगले; पुन्हा हाती निराशा…!

---Advertisement---

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या महिला टी20 विश्वचषक 2024 उपांत्य फेरीत खेळण्याच्या आशेवर पाणी फेरलं आहे. न्यूझीलंड अ गटातून सेमी फायनलसाठी दुसरा संघ ठरला आहे. न्यूझीलंडने सोमवारी पाकिस्तानचा 54 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. न्यूझीलंडच्या पराभवामुळे उपांत्य फेरी गाठण्याच्या भारताच्या आशा अपूर्ण राहिल्या. न्यूझीलंडने साखळी फेरीतील चारपैकी तीन सामने जिंकले. किवी संघाच्या खात्यात आता 6 गुण आहेत. त्याचवेळी भारताने दोन सामने जिंकून केवळ चार गुण मिळवले. ज्यामुळे भारत तिसऱ्या क्रमांकावर राहिला.  तर चार सामने जिंकून ऑस्ट्रेलिया सेमी फायनलसाठी आधीच पात्र ठरला आहे.

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर नाणेफेक जिंकून न्यूझीलंड पहिल्या डावात फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर 111 धावांचे  सोपे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. आलिया रियाझ (0) दुसऱ्याच षटकात पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर सलग पाकिस्तानच्या विकेट पडू लागल्या. पाकिस्तानने अवघ्या 28 धावांत पाच विकेट गमावल्या. कर्णधार फातिमा सनाने सर्वाधिक 21 धावा केल्या. मुनिबा अलीने 15 धावांचे योगदान दिले. 8 खेळाडूंना दुहेरी आकडा गाठता आला नाही तर चार खेळाडूंचे खातेही उघडता आले नाही. न्यूझीलंडने पाकिस्तानचा डाव 11.4 षटकांत 56 धावांत गुंडाळला. न्यूझीलंडकडून अमेलिया केरने तीन आणि इडन कार्सनने दोन विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, पाकिस्तानने न्यूझीलंडला निर्धारित 20 षटकांत 6 बाद 110 धावांवर रोखले. डावखुरा फिरकी गोलंदाज नसरा संधूने शानदार गोलंदाजी केली. तिने चार षटकांच्या स्पेलमध्ये 18 धावांत तीन बळी घेतले. संधू आणि ओमाइमा सोहेल (1 बळी) यांनी मधल्या षटकांमध्ये न्यूझीलंडच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले. त्यामुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. मात्र पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण अत्यंत निराशाजनक होते. पाकिस्तानने आठ झेल सोडले. न्यूझीलंडकडून सलामीवीर सुझी बेट्सने सर्वाधिक 28 धावा केल्या. त्याने 29 चेंडूंच्या खेळीत तीन चौकार मारले. ब्रूक हॅलिडेने 24 चेंडू आणि 2 चौकारांच्या मदतीने 22 धावा जोडल्या. कर्णधार सोफी डिव्हाईनने 19 आणि जॉर्जिया प्लिमरने 17 धावा केल्या.

हेही वाचा-

PAKW vs NZW; पाकिस्तानच्या पराभवामुळे भारत टी20 विश्वचषकातून बाहेर
बेजबाॅलला फ्लाॅप ठरवणार गौतम गंभीरचा ‘हा’ प्लॅन! न्यूझीलंड मालिकेपूर्वीच केले मोठे वक्तव्य
आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे टाॅप-5 खेळाडू

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---