भारतासाठी कुस्तीतून आनंदाची बातमी येत आहे. टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये बुधवारी (४ ऑगस्ट) झालेल्या पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व सामन्यात भारताचा कुस्तीपटू रवी कुमार दहियाने बल्गेरियाच्या व्हॅलेंटिनोव्ह जॉर्जी वांगेलोव्हला तांत्रिक श्रेष्ठतेने १४-४ ने पराभूत करत उपांत्य सामन्याचे तिकीट खिशात घातले आहे.
रवीने पहिल्या राऊंडमध्ये व्हॅलेंटिनोव्हला ६-२ ने पराभूत केले होते. दुसऱ्या राऊंडमध्ये व्हॅलेंटिनोव्हने पलटवार करण्याचा प्रयत्न केला आणि २ गुण मिळवले. मात्र, रवीनेही गुण मिळवणे सुरूच ठेवले आणि अंतर १० गुणांनी वाढवत सामना संपवला. (Indian Wrestler Ravi Dahiya beats Georgi Valentinov Vangelov to qualify for men’s freestyle (57kg) semi-final)
News Flash: #Wrestling : Ravi Kumar Dahiya storms into Semis (FS 57kg) with 14-4 win over Bulgarian grappler.
Just one win away from ensuring a medal for India. #Tokyo2020 #Tokyo2020withIndia_AllSports pic.twitter.com/QggSsI555T— India_AllSports (@India_AllSports) August 4, 2021
आता उपांत्य सामन्यात त्याचा सामना कझाखस्तानच्या नुरिस्लम सनयेवशी होणार आहे. ज्याने उपांत्यपूर्व सामन्यात यजमान जपानच्या ताकाहाशी युकीला ४-४ ने बरोबरी साधत सामना तांत्रिक आधारावर जिंकला.
रवीने उपांत्यपूर्व सामन्यात माजी जागतिक चॅम्पियन आणि २०१७ चा आशियाई चॅम्पियन जपानच्या यूकी ताकाहाशीला ६-१ ने पराभूत करत उपांत्य सामन्यात प्रवेश केला होता. तरीही, त्याला उपांत्य सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-क्या बात है! नायझेरियाच्या एजीओमोरला भारतीय पठ्ठ्याने चारली धूळ; आता भिडणार चीनच्या कुस्तीपटूशी
-बेलारूसच्या इरियानाकडून अंशू मलिकचा दारुण पराभव; तरीही जिंकू शकते कांस्य पदक
-लय भारी! रवी दहियाने कोलंबियाच्या कुस्तीपटूवर मिळवला १३-२ ने एकतर्फी विजय; गाठली उपांत्यपूर्व फेरी