आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेता बजरंग पुनिया याला पुढील वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू चांगली कामगिरी करून पदक जिंकतील असा विश्वास आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताची चांगली कामगिरी बघता त्याला संघ चांगलाच लयीत आहे असा विश्वास आहे.
“मला वाटते की आपण टोकियो ऑलिम्पिकममध्ये कुस्तीप्रकारात तीन ते चार पदके जिंकू. वर्ल्ड चॅम्पियनशिप ही ऑलिम्पिकपेक्षा अवघड स्पर्धा आहे पण आपण तेथे चांगली कामगिरी केली. त्यामुळे भारतीय कुस्तीपटू उत्तम लयीत आहेत आणि त्यामुळे ते पदकाचे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले आहेत” असे पुनिया म्हणाला.
सुरुवातीला २०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धा कोविड -१९ साथीच्या आजारामुळे एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आल्या. बजरंग पुनिया (कांस्य, ६५ किलो) सोबतच दीपक पुनिया (रौप्य, ८६ किलोग्राम), विनेश फोगट (कांस्य, ५३ किलो) आणि रवी कुमार दहिया (कांस्य, ५७ किलो) यांनीही कझाकिस्तानमधील २०१९ च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत पदके जिंकली आणि ऑलिम्पिक स्पर्धेत प्रवेश मिळविला.
बजरंग पुनिया ने त्याच्या चर्चेत हेही सांगितले की, जर तो कुस्ती खेळला नसता तर तो त्याच्या गावात एक सामान्य जीवन जगला असता. आपल्या कारकिर्दीतील आत्तापर्यंतचा सर्वात अविस्मरणीय अनुभव म्हणून त्याने आपले पहिले वर्ल्ड चॅम्पियनशिप पदक असे देखील सांगितले. २०१३ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये हरियाणाच्या या मुलाने प्रभावी खेळी करून वयाच्या १९ व्या वर्षी कांस्यपदक जिंकले.
आपल्या ६५ किलो वजनी गटातील सध्याच्या स्पर्धेबद्दल बोलताना पुनिया म्हणाला: “मला वाटते की ६५ किलोग्राम जगातील सर्वात कठीण श्रेणी आहे. असे कोणतेही कुस्तीपटू नाही की ज्याने सलग विश्वविजेतेपद किंवा ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकली आहेत. प्रत्येक वेळी एक नवीन विजेता असतो. या प्रवर्गात चांगले कुस्तीपटू आहेत जे त्यांच्या दिवशी कोणालाही हरवू शकतील.”
“पुढे खेलो इंडिया सारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी सरकार व क्रीडा महासंघाचे पुनियाने कौतुक केले. तरूण आणि होतखरू क्रीडापटूंना त्यांची कौशल्य दाखविण्यासाठी त्यांना आवश्यक ते व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. “आपण ज्याप्रमाणे खेलो इंडियासारख्या कार्यक्रमाचे आयोजित करीत आहोत, त्यामुळे अनेक तरुणांना त्यास आवश्यक असणारा पाठिंबा मिळत आहे. असा पाठिंबा जर त्यांना मिळत राहिला तर कुस्तीमध्येच नाही तर, ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक खेळात भारत पदक जिंकेल, ’असे त्याने व्यक्त केले.