भारतीय कुस्ती महासंघाने 12 ते 18 डिसेंबरदरम्यान बेलग्रेड येथे होणाऱ्या वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेसाठी 27 सदस्यीय महिला व पुरुष संघाची घोषणा केली होती. आता या संघांचा रवाना होण्याचा वेळापत्रक निःश्चित झाला आहे. फ्रीस्टाईल, ग्रीको रोमन आणि महिला कुस्ती संघ वेगवेगळ्या दिवशी विश्वचषक खेळण्यासाठी बेलग्रेडला रवाना होतील.
वैयक्तिक विश्वचषक स्पर्धा 12 ते 18 डिसेंबरदरम्यान बेलग्रेडमध्ये खेळली जाणार आहे. ग्रीक रोमन शैलीची स्पर्धा 12 व 13 डिसेंबरला सुरु होईल. त्यानंतर महिला कुस्ती स्पर्धा होईल आणि अखेर फ्री स्टाईल स्पर्धा होणार आहे.
भारतीय कुस्ती संघही वर्ल्ड कपच्या वेळापत्रकानुसार प्रवास करणार आहे. प्रथम ग्रीको-रोमन संघ 9 डिसेंबरच्या रात्री प्रवास करेल, तर महिला संघ १२ डिसेंबरला रवाना होईल. त्यानंतर फ्रीस्टाईल संघ त्यानंतर 14 डिसेंबर रोजी बेलग्रेडला जाईल.
तीन भारतीय कुस्तीपटू नरसिंग, गुरप्रीत आणि दिव्या काकरण यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर गटात चिंतेचं वातावरण निर्माण झालं होतं. पण इतर सर्व कुस्तीपटू सुरक्षित असून ते विश्वचषक स्पर्धेत वेळेवर रवाना होतील.
वैयक्तिक विश्वचषकातील कुस्ती संघ :
फ्री स्टाईलः रवी कुमार (57 किलो), राहुल आवारे (61 किलो), नवीन (70 किलो), नरसिंग यादव (74 किलो), गौरव बालियन (79 किलो), दीपक पूनिया (86 किलो), सत्यव्रत कादियन (97 किलो), सुमित (125 किलो)
ग्रीको रोमन: अर्जुन हलकुर्की (55 किलो), ज्ञानेंद्र (60 किलो), सचिन राणा (63 किलो), आशु (67 किलो), आदित्य कुंडू (72 किलो), साजन (77 किलो), गुरप्रीत सिंग (82 किलो), सुनील कुमार (87 किलो), हरदीप ( 97 किलो) नवीन (130 किलो)
महिला कुस्ती: निर्मला देवी ( 50 किलो), पिंकी ( 55 किलो), अंशु (57 किलो), सरिता (59 किलो), सोनम ( 65 किलो), साक्षी मलिक (65 किलो), दिव्या काक्रण ( 68 किलो), गुरशरण कौर (72 किलो), किरण (76 किलो)
महत्त्वाच्या बातम्या –
वैयक्तिक विश्वचषक स्पर्धेसाठी बजरंग होणार रवाना, तर ‘या’ स्टार कुस्तीपटूची माघार