गेल्या कित्येक दिवसांपासून क्रिकेट क्षेत्र ठप्प पडले आहे. यामुळे खेळाडूंना, इतर कर्मचाऱ्यांना आणि बोर्डाला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले. परंतु, आता आयसीसीसोबत इतर क्रिकेट बोर्डही लवकरात लवकर क्रिकेटची नव्याने सुरुवात करण्याच्या तयारीला लागले आहेत.
अशात क्रिकेट सुरु झाल्यानंतर खेळाडूंना या महामारीची लागण होऊ नये म्हणून आयसीसीने नव्या गाइडलाइन्स जाहीर केल्या आहेत. त्यामुळे भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला या नव्या नियमांमुळे कोणत्या गोष्टींची जास्त आठवण येईल याचा खुलासा केला आहे. Jasprit Bumrah Talks About Saliva Ban And The Things He Will Miss After Restart
आयसीसीच्या पॉडकास्टमध्ये इयान बिशप यांच्याशी बोलताना बुमराह म्हणाला की, “मला विकेट घेतल्यावर जल्लोष साजरा करण्यासाठी संघसहकाऱ्यांच्या गळाभेट घेणे किंवा एकमेकांना हाताने हाय फाइव्ह करणे अशा गोष्टी करायला आवडत नाहीत. त्यामुळे या गोष्टींची मला जास्त कमी जाणवणार नाही. परंतु, माझी चेंडूला लाळ लावण्याची जी सवय आहे, त्याची मला खूप कमी जाणवेल. मला माहिती नाही की खेळ सुरु झाल्यावर काय-काय होईल. पण, आयसीसीने यासाठी दुसरा पर्याय उपलब्ध करुन द्यायला पहिजे.”
बुमराहला वाटते की, “जर गोलंदाजांना लाळेचा वापर करु दिला नाही. तर खेळ पूर्णपणे फलंदाजांच्या जोरावर चालणार. चेंडूला लाळ न लावण्यामुळे गोलंदाजांना खूप समस्या निर्माण होतील. मैदानांचा आकार छोटा होत आहे आणि खेळपट्टीही सपाट असते. त्यामुळे आमच्याकडे चेंडूवरील चमक टिकवण्यासाठी कोणता तरी पर्याय असायला हवा. जेणेकरुन चेंडूला स्विंग किंवा रिव्हर्स स्विंग मिळेल.”
शिवाय ज्या फलंदाजांना गोलंदाजांच्या स्विंगशी अडचण आहे. त्या फलंदाजांना प्रत्युत्तर देत बुमराहने म्हटले की, “फक्त भारतीय संघात नव्हे तर प्रत्येक संघातील फलंदाजांची समस्या असते की, चेंडू स्विंग होत आहे. पण आम्ही फक्त थ्रोडाउन करण्यासाठी चेंडू नाही टाकत.”
तसेच आपल्या फिटनेसबाबत बोलताना बुमराह म्हणाला की, “मला माहिती नाही की २-३ महिन्यांनंतर गोलंदाजी करताना शरीर कश्याप्रकारे व्यवहार करेल. पण मी माझ्या फिटनेसवर खूप लक्ष देत आहे आणि मी पूर्णपणे फिट असल्याचे मला वाटते. मी आठवड्यात ६ दिवस सराव करतो. पण बऱ्याच दिवसांपासून गोलंदाजी केलेली नाही.”
ट्रेंडिंग घडामोडी-
केवळ महिला पत्रकार असल्यामुळे तिच्याशी नव्हते बोलत कुणी
माझा मृत्यू विमान अपघातात होईल आणि मी स्वर्गात जाईल; २ वर्षांनी बरोबर तसेच घडले
हार्दिक पंड्या होणार बाबा! पत्नी नताशाच्या एक्स बॉयफ्रेंडने दिली अशी…