रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. याठिकाणी भारत आणि वेस्ट इंडीजमध्ये कसोटी, वनडे आणि टी-20 फॅरमॅटमधील एकून 10 सामने खेळले जाणार आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर भारतीय संघ आयर्लंडसाठी रवाना होईल. आयर्लंडविरुद्धच्या तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेत संघाला नवीन कर्णधार मिळण्याची शक्यता आहे. कारण हार्दिक पंड्या याला विश्रांती दिली जाऊ शकते.
वेस्ट इंडीडविरुद्धची कसोटी मालिका सध्या भारतीय संघ खेळत आहे. मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेनमध्ये खेळला जात आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेत भारताचे कर्णधारपद रोहित शर्मा () सांभाळणार आहे. तर उभय संघांतील टी-20 मालिकेत कर्णधारपद हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याच्याकडे आहे. आयर्लंड दौऱ्यात मात्र रोहित आणि हार्दिक यांना विश्रांती दिली, तर संघाला नव्या कर्णधाराची जरज आहे. अशात ही जबाबदारी सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर दिली जाऊ शकते.
माध्यमांतील वृत्तांनुसार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आयर्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करताना दिसू शकतो. सूर्यकुमारला वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेत उपकर्णधार निवडले आहे. आयर्लंडविरुद्ध जर त्याच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली, तर त्याच्या प्रदर्शनावर सर्वांचे लक्ष असेल.
भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्याचा विचार केला, तर कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतालाने डाव आणि 141 धावांनी जिंकला होता. मालिकेतील दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडीजला विजय मिळवता आला तर मालिका बरोबरीवर सुटेल. जर भारताने हा सामना जिंकला किंवा अनिर्णित जरी केली, तर मालिका भारताच्या नावावर होईल. उभय संघांतील तीन सामन्यांची वनडे मालिका 27 जुलै ते 1 ऑगस्ट यादरम्यान खेळला जाणार आहे. त्यानंतर वेस्ट इंडीजविरुद्धची पाच टी-20 सामन्यांची मालिका 3 ते 13 ऑगस्टदरम्यान खेळली जाईल. संघाचा आयर्लंड दौरा 18 ते 23 ऑगस्टदरम्यान सहा दिवसांचा असेल. (India’s new captain will be announced soon! Decision to be taken for Ireland tour)
महत्वाच्या बातम्या –
‘जेव्हा मी क्रीझवर पाऊल ठेवले, ती वेळ…’, विक्रमी शतकानंतर काय म्हणाला विराट?
‘पाऊस झाला तर चांगलंच होईल’, पराभवापासून वाचण्यासाठी कांगारू खेळाडूचं मोठं विधान