भारतीय क्रिकेट संघाला मंगळवार, 4 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसरा टी-20 सामना खेळायचा आहे. टी-20 मालिकेतील हा शेवटचा सामना असून भारतीय संघ काही महत्वाच्या खेलाडूंच्या गैरहजेरीत हा सामना खेळेल. पहिल्या दोन सामन्यांमध्ये बारताने विजय मिळवून मालिका देखील नावावर केली आहे. तिसऱ्या सामन्यात जर भारताने विजय मिळवला, तर पाहुण्या आफ्रिकी संघाला क्लीन स्वीप मिळेल. परंतु हे सर्व तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनवर अवलंबून असेल, जे या सामन्यात चांगले प्रदर्शन करू शकतील.
तीन सामन्यांची ही टी-20 मालिका भारताने आधीच जिंकली आहे. अशात तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून नाक राकण्यासाठी दक्षिण आफ्रिका संघ प्रयत्न करेल. अशात या सामन्यात दोन्ही संघांकडून विजय मिळवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील. पहिल्या दोन सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव (Suryakumar Dhawan) याने ताबडतोड फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. पण दुसरीकडे भारतीय गोलंदाजी विभाग मात्र पुन्हा एकदा अपयशी ठरताना दिसला होता. तिसऱ्या टी-20 सामन्यात श्रेयस अय्यर आणि मोहम्मद सिराज या दोघांनी संधी प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते. सिराज बुमराहचा बदली खेळाडू आहे, तर श्रेयसला विराट आणि राहुच्या जागी संधी दिली जाऊ शकते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यासाठी भारताची संभावित प्लेइंग इलेव्हन –
रोहित शर्मा (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, आर अश्विन, हर्षल पटेल, दीपक चाहर, मोहम्मद सिराज.
मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग () सर्वोत्तम प्रदर्शन गोलंदाज ठरला होता. पण तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. मागच्या सामन्यातील शेवटच्या षटकात यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने लागोपाट दोन षटकार मारून भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले होते. अशात शेवटच्या सामन्यात त्याला रिषभ पंतच्या आधी प्लेइंग इलेव्हनमध्ये कार्तिकला प्राधान्य मिळू शकते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
महिला आशिया चषक: टीम इंडियाची विजयी हॅट्रिक! जेमिमा-दीप्तीची तुफानी फलंदाजी
नादच खुळा! टी20 विश्वचषकात जगभरातल्या 15 पंचांसोबत एकमेव भारतीय अंपायर करणार ‘पंचगिरी’