टोकियो ऑलिंपिक्स २०२० मध्ये शुक्रवारी (६ ऑगस्ट) भारतीय महिला कुस्तीपटूने निराश केले. भारतीय कुस्तीपटू सीमा बिस्ला आपल्या पहिल्याच सामन्यात पराभूत झाली. महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या उपांत्य पूर्व सामन्यात ट्युनिशियाच्या सारा हमदीने सीमाला १-३ ने पराभूत केले. मात्र, अजूनही ती कांस्य पदक जिंकण्याची शक्यता आहे.
या सामन्यात सीमा सुरुवातीपासूनच पिछाडीवर होती. ब्रेकच्या वेळेपर्यंत ती ०-१ ने मागे होती. ट्युनिशियाच्या कुस्तीपटूने सीमाचे मनगट अकडवून ठेवले होते, त्यामुळे तिला दाव लावता आला नाही. रेफरीने तिला आक्रमणासाठी २० सेकंदाचा वेळ दिला. मात्र, ती साराच्या तावडीतून सुटण्यात अपयशी ठरली. त्यामुळे तिला गुण गमवावे लागले. (India’s Seema Bisla loses to Sarra Hamdi of Tunisia in women’s 50kg freestyle 1/8 final)
India’s Seema Bisla goes down 1-3 to Tunisia's Sarra Hamdi in the pre-quarterfinal of the Women's 50 Kg Freestyle wrestling at #Tokyo2020
Watch this space for more updates on #Olympics #Wrestling#Cheer4India
— SAI Media (@Media_SAI) August 6, 2021
आता ट्युनिशियाच्या साराला अंतिम सामन्यात पोहोचण्याची अपेक्षा करावी लागेल. जेणेकरून सीमाला रेपचेज राऊंडमध्ये उतरण्याची संधी मिळू शकेल.
महत्त्वाच्या बातम्या-
-दिपक पुनियाच्या हातून निसटले ‘कांस्य’, रोमांचक सामन्यात झाला पराभूत
-टोकियो ऑलिंपिकमधील रवी दहियाच्या सोनेरी कामगिरीचा ग्रामस्थांकडून जल्लोष, गावभर केला दीपोत्सव