पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर सुमारे 14 दिवसांनी भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने लॉसने डायमंड लीग 2024 मध्ये भाग घेतला. पॅरिस ऑलिम्पिकमधील लॉसने डायमंड लीगमध्ये विक्रम मोडीत काढत नीरजने यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम थ्रो केला आहे. मात्र, मोसमातील सर्वोत्तम थ्रो करूनही नीरज दुसऱ्या क्रमांकावर राहिला. दुसऱ्या क्रमांकावर आल्यानंतर नीरजने सांगितले की, सुरुवातीला अजिबात चांगले वाटत नव्हते, पण माझ्या थ्रोमुळे मी आनंदी आहे.
वास्तविक, लॉसने डायमंड लीगमध्ये, नीरजने सहाव्या आणि शेवटच्या प्रयत्नात 89.49 मीटरची थ्रो केली, जी पॅरिस ऑलिम्पिकमधील 89.45 मीटरच्या थ्रोपेक्षा चांगली होती. पहिल्या काही प्रयत्नांत नीरजला 85 मीटरचा टप्पा गाठणे कठीण झाले होते.. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 90.61 मीटर थ्रो करून लीगमधील पहिला क्रमांक पटकावला.
या स्पर्धेनंतर बोलताना नीरज म्हणाला, “सुरुवातीला चांगले वाटले नाही, पण आता मी माझ्या थ्रोमुळे खूश आहे, विशेषत: माझ्या शेवटच्या प्रयत्नातील दुसरा सर्वोत्तम (करिअर) थ्रो आहे. ही स्पर्धा सुरुवातला कठीण होती. पण नंतर पुनरागमन झाले, पण पुठील काळात मी आणखी जोर लावणार आहे. मला 90 मीटरचा टप्पा पार करायचे आहे”.
डायमंड लीग मधील पहिल्या थ्रोमध्ये नीरजने 82.10 मीटर अंतरावर भालाफेक केली होती. यानंतर दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने 83.21 मीटरचे अंतर पार केले. त्यानंतर तिसऱ्या थ्रोमध्ये तो केवळ 83.13 मीटर आणि चौथ्या थ्रोमध्ये तो केवळ 82.34 मीटर अंतर कापू शकला. यानंतर नीरजच्या पाचव्या थ्रोमध्ये थोडी सुधारणा झाली आणि त्याने 85.58 मीटर थ्रो केले. त्यानंतर सहाव्या आणि शेवटच्या थ्रोमध्ये नीरजने 89.49 मीटर अंतरावर भालाफेक करून मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली.
उल्लेखनीय म्हणजे की नीरज कंबरेच्या दुखापतीने त्रस्त आहे. परंतु तरीही त्याने लॉसने डायमंड लीगमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक जिंकल्यानंतर नीरज त्याच्या मांडीच्या दुखापतीबद्दल बोलला होता. गरज पडल्यास शस्त्रक्रियेकडेही लक्ष देता येईल, असेही तो म्हणाला होता.
हेही वाचा-
नीरज चोप्राने अवघ्या 14 दिवसांतच मोडला ऑलिम्पिक विक्रम, केला हंगामातील सर्वोत्तम थ्रो!
केएल राहुलची निवृत्तीची घोषणा? सोशल मीडिया पोस्टमुळे उडाली खळबळ
‘काही खास केले…’, राहुल द्रविडने 2 महिन्यांनंतर उघड केले विश्वविजेता बनण्याचे रहस्य