सूर्यकुमार यादवच्या तुफानी फलंदाजीने भारताने श्रीलंकेचा तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-1 असा पराभव केला. ही मालिका भारत हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली खेळला. या मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी (7 जानेवारी) राजकोटमध्ये खेळला गेला. ज्यामध्ये सूर्यकुमारने नाबाद शतकी खेळी केली. त्याची फलंदाजी पाहून चाहते तर भलतेच खूष आहेत, तसेच त्याचा संघसहकारी युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal)यानेही वेगळ्याचप्रकारे त्याचे आभार मानले आहे. चहल-सूर्यकुमारच्या त्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
32 वर्षीय सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने मालिका निर्णायक सामन्यात ज्याप्रकारे फलंदाजी केली ती पाहून त्याच्या संघसहकाऱ्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. सर्वांनी त्याचे कौतुक केले असून फिरकीपटू चहलनेही सामन्यानंतर सूर्यकुमारचा हात हातात घेतला. चहलने सर्वप्रथम त्याचा हात डोळ्यांना लावला आणि नंतर किस केले.
सामन्यानंतर सूर्यकुमार म्हणाला, “फलंदाजी करताना कसे शॉट्स मारायचे हे डोक्यात असते, मात्र कधी गोलंदाजाचा चेंडू वेगळाच पडतो त्यासाठी वेगळ्या प्रकारची फलंदाजी करायला सदैव तयार असावे. द्रविड यांनी मला जशी हवी तशी फलंदाजी करण्याची मुभा दिली आहे. त्यांनी मला तुझी फलंदाजी आणि खेळ याचा आनंद घे असे सांगितले आहे.”
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1611933320090378245?s=20&t=_tjUtbsz5ExD4eE9b3V8kA
या सामन्यात भारत जेव्हा मैदानात उतरला तेव्हा हा सामनाही रोमांचक होणार असेच चाहत्यांना वाटत होते. भारताने मोठ्या धावांनी विजय मिळवला असला तरी सूर्यकुमारची पुन्हा एकदा जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. त्याने 51 चेंडूत नाबाद 112 धावा केल्या. यामध्ये त्याने 7 चौकार आणि 9 षटकार मारले. तसेच राहुल त्रिपाठी यानेही 16 चेंडूत 35 धावा केल्या. त्यामुळे भारताने 20 षटकात 5 विकेट्स गमावत 228 धावा केल्या.
श्रीलंका जेव्हा लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरली तेव्हा भारतीय गोलंदाजांनी काही मोठ्या चुका केल्या नाहीत. कुशल मेंडिस हा मोठे शॉट्स मारत होता, तेव्हा भारतीय चाहत्यांना थोडी चिंता जाणवत होती. त्याचा अडसर अक्षर पटेलने दूर केला. मेंडिस 15 चेंडूत 23 धावा करत उमरान मलिक याच्याकरवी झेलबाद झाला.
यामध्ये चहलला देखील विकेट्स मिळाल्या. त्याने धनंजया डि सिल्व्हा आणि चरिथ असालंका यांना बाद केले. तसेच सर्वाधिक विकेट्स अर्शदीप सिंगला (3) मिळाल्या. हा सामना भारताने 91 धावांनी जिंकला. (Yuzvendra Chahal Kissed Suryakumar Yadav Hands, INDvSL 3rd T20)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘लहानपणी तरी माझी फलंदाजी पाहिली…’, प्रशिक्षक द्रविडच्या प्रश्नावर सूर्याचे दिलखुलास उत्तर
ISL 2022-23: संडे ब्लॉकबस्टर्समध्ये मुंबई सिटीसमोर केरळा ब्लास्टर्सचे आव्हान