एशिया कप (Asia Cup) २०२२च्या महासंग्रामाला शनिवारी (२७ ऑगस्ट) सुरूवात होत आहे. युनायटेड अरब अमिरातीमध्ये येथे या स्पर्धेचे सामने खेळले जाणार आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना यजमान संघ श्रीलंका विरुद्ध अफगानिस्तान यांच्यात खेळला जाणार आहे. तर भारताचा पहिला सामना रविवारी (२८ ऑगस्ट) पाकिस्तान विरुद्ध आहे. दुबईमध्ये खेळल्या जाणाऱ्या या सामन्याआधीच वातावरण तापलेले असताना पाकिस्तानच्या खेळाडूने विराट कोहलीबाबत चकीत करणारे विधान केले आहे.
एशिया कप, भारत-पाकिस्तान सामना आणि विराट
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेंकाविरोधात आयसीसी आणि मुख्य स्पर्धाव्यतिरिक्त द्विपक्षीय मालिका खेळत नाही. यामुळे या दोन्ही संघात जेव्हा सामने होतात ती क्रिकेट चाहत्यांसाठी एकप्रकारची मेजवाणीच असते. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याने पाकिस्तान विरुद्ध मागील काही सामन्यांमध्ये मोठी खेळी केली आहे, मात्र सध्या तो आऊट ऑफ फॉर्म आहे. यावरून काही तज्ञ लोकांनी त्याच्या विश्वचषकाच्या जागेवर प्रश्नचिन्हही उपस्थित केले आहे. सध्यातरी विश्वचषकासाठी संघ जाहीर नाही झाला, पण विराटला संघाबाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे.
विरोधी संघामध्ये विराटची दहशत नाही?
काहींनी विराटच्या फॉर्मवर टीका करत तो विरोधी संघासमोर शक्य तेवढी भीती आणि दबाब निर्माण करत नाही. चाहत्यांसाठी ही टीका काही प्रमाणात मर्यादीत आहे, मात्र जो खेळाडू मैदानावर त्याचा सामना करतो त्यांचे विचार वेगळे आहेत. त्याच खेळाडूंचे प्रतिनिधित्व करताना पाकिस्तानचा उपकर्णधार- गोलंदाज शादाब खान (Shadab Khan) याने आश्चर्यकारक विधान करत सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
शादाब खानचा जबरदस्त रिप्लाय
शादाबने सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटबाबत म्हटले, “माजी क्रिकेटपटू आता खेळत नाही, यामुळे त्यांना विराट विरोधी संघामध्ये भीती निर्माण करतो की नाही हे नीट माहीत नाही. खरं तर हे आहे की, विराट हा एक दिग्गज आहे आणि त्याने आधीच उत्तम कामगिरी केली आहे. तो जेव्हाही येतो तेव्हा थोडी भीती वाटते कारण तो एक मोठा खेळाडू आहे. त्याने आमच्याविरुद्ध मोठी खेळी करावी, ही आमची मुळीच इच्छा नाही.”
विराटची पाकिस्तान विरुद्धची टी२० सरासरी ७७.७५ आहे. त्याने ७ सामन्यात ३ अर्धशतके करत ३११ धावा केल्या आहेत. टी२० प्रकारात खेळली जाणारी ही एशिया कप स्पर्धा आगामी टी२० विश्वचषकासाठी फायद्याची ठरणार आहे. यावर्षीचा टी२० विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या-